शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

तंत्रशिक्षण मंडळातर्फे १२ जूनला विद्यार्थ्यांचे समुमदेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 16:17 IST

 दहावी बारावीनंतर विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निक डिप्लोमा विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे व  उद्योजकांकडून नोकरी व व्यवसायाच्या संधींबाबत माहिती मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळातर्फे  १२ जून रोजी अभियांत्रिकी पदविका समुपदेशन २०१९ हा लाईव्ह ब्रॉडकास्टिंग मार्गदर्शनपर उपक्रम राबविला जाणार आहे. 

ठळक मुद्देपॉलिटेक्निक डिप्लोमा विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन नोकरी व व्यवसायाच्या संधींबाबत माहिती मिळणार मार्गदर्शन सत्राचे होणार लाईव्ह ब्रॉडकास्टिंग

नाशिक :  दहावी बारावीनंतर विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निक डिप्लोमा विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे व  उद्योजकांकडून नोकरी व व्यवसायाच्या संधींबाबत माहिती मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळातर्फे  १२ जून रोजी अभियांत्रिकी पदविका समुपदेशन २०१९ हा लाईव्ह ब्रॉडकास्टिंग मार्गदर्शनपर उपक्रम राबविला जाणार आहे. व्यावसायिक शिक्षणातील करिअरचा पर्याय म्हणून अनेक विद्यार्थी दहावी-बारावीनंतर अभियांत्रिकी पदविका पॉलिटेक्निक डिप्लोमा  या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याचा विचार करतात. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पॉलिटेक्निककडे विद्यार्थ्यांचा कल कमी झाला असला तरी डिप्लोमानंतर लघू उद्योगांसह मोठ्या औद्योगिक कंपन्यांमध्ये चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याने अजूनही विद्यार्थी या क्षेत्राकडे सकारात्मतेने पाहतात. त्याच्या या सकात्मकतेला निर्णयात परीवर्तीत करण्यासाठी विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ होणार आहे. नाशिक, औरंगाबादसह  राज्यभरातील सर्व पॉलिटेक्निक महाविद्यालयांत सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत हा कार्यक्रम लाईव्ह दाखविण्यात येणार असून यात तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ आणि एमसबीटीईचे संचालक डॉ.विनोद मोहीतकर यांचे तंत्रशिक्षण क्षेत्रातील संधी विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन तंत्र शिक्षण मंडळाचे सहसंचालक प्रा. ज्ञानदेव नाठे यांनी केले आहे. यात दहावी व बारावीचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. सामनगाव येथील शासकीय तंत्रनिकेनतन महाविद्यालयासह सर्वच तंत्रनिकेतनमध्ये हा कार्यक्रम दाखविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.  प्रादेशिक महाविद्यालयांनाही मार्गदर्शन तंत्रशिक्षण मंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयातर्फे शुक्रवारी (दि.७) उत्तर महाराष्ट्रातील नाशिकसह,धुळे,नंदूरबार,जळगाव व अहमदनगर या पाचही जिल्ह्यातील सुमारे १२५ महाविद्यालयांतील  विद्यार्थ्यांना  डीटीईचे सहायक संचालक प्रा. संजय पगार व प्रा.लक्ष्मीकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले.   

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय