आडवाडी येथे आगीत गवत खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 00:47 IST2018-04-07T00:47:41+5:302018-04-07T00:47:41+5:30
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील आडवाडी (मधली) येथे काल मध्यरात्री खळ्यातील चाराऱ्यास आग लागून ४३ ंहजार ७०० रु पयाचे नुकसान झाले.

आडवाडी येथे आगीत गवत खाक
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील आडवाडी (मधली) येथे काल मध्यरात्री खळ्यातील चाराऱ्यास आग लागून ४३ ंहजार ७०० रु पयाचे नुकसान झाले. आडवाडी मधली येथील बणकट देवराम बिन्नर यांच्या खळ्यात गुरु वारी रात्री साडेअकराच्या सुमारास गवताला अचानक आग लागली. घरातील माणसांच्या आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी सिन्नर नगरपलिकेच्या अग्निशामक दलाला फोन करून कळविले.
त्यानंतर गावातील लोकांना फोनवरून सांगितले असता ग्रामस्थांनी बिन्नर यांच्या घराकडे धाव घेतली. पण तोपर्यंत गवत वाळलेले असल्याने खाक झाले होते. लोकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला; पण प्रयत्न अयशस्वी ठरले. अग्निशमन दलाच्या गाडी आल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळण्यात आले़