गव्हाळ खून; तिघांना अटक

By Admin | Updated: October 20, 2015 23:16 IST2015-10-20T23:16:17+5:302015-10-20T23:16:49+5:30

संशयित सर्व रिक्षाचालक : शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी

Bloody blood; Three arrested | गव्हाळ खून; तिघांना अटक

गव्हाळ खून; तिघांना अटक

नाशिक : क्रांतिनगरमधील रिक्षाचालक नीलेश गव्हाळ खून प्रकरणी तालुका पोलिसांनी मंगळवारी (दि़२०) तिघा संशयितांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली़ शुक्रवारी (दि़९) रात्रीच्या सुमारास मनोली शिवारात गव्हाळचा रिक्षा उलटल्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक नोंद तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती़ मात्र चौकशीनंतर हा खून असल्याचे निष्पन्न झाल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला़
तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत रिक्षाचालक नीलेश बळीराम गव्हाळ (वय ३५, उदय कॉलनी, क्रांतिनगर, पंचवटी) व संशयित लक्ष्मण उर्फ लखन राजेंद्र पवार (२५, राफ़ुलेनगर), चेतन द्वारकानाथ दिवे (२५, रा़ पेठरोड), बाबासाहेब उर्फ बाबड्या शिवाजी बढे (३९, रा़रामवाडी, तळेनगर) यांच्यामध्ये वाढदिवसाच्या दिवशी तोंडाला केक लावण्याच्या कारणावरून वाद झाला होता़ त्या रागातून गव्हाळचा खून करून मनोली शिवारात रिक्षाचा अपघात झाल्याचा बनाव संशयितांनी केला होता़
नीलेश गव्हाळच्या अपघाती मृत्यूप्रकरणी त्याचा भाऊ मेघेश व कुटुंबीयांनी घातपाताच्या संशय व्यक्त केल्यानंतर तालुका पोलिसांनी दुसऱ्या दिवशी खुनाचा गुन्हा दाखल केला होता़ या गुन्ह्यात अटक करण्यात आलेले तिन्ही संशयित रिक्षाचालक असल्याची माहिती असून, या तिघांनाही २३ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली
आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Bloody blood; Three arrested