पूर्ववैमनस्यातून चाकूने गळ्यावर वार करून निर्घृणरीत्या खून

By Admin | Updated: February 17, 2015 01:07 IST2015-02-17T01:07:04+5:302015-02-17T01:07:40+5:30

पूर्ववैमनस्यातून चाकूने गळ्यावर वार करून निर्घृणरीत्या खून

Bloodless murder by stabbing a knife through prejudice | पूर्ववैमनस्यातून चाकूने गळ्यावर वार करून निर्घृणरीत्या खून

पूर्ववैमनस्यातून चाकूने गळ्यावर वार करून निर्घृणरीत्या खून

नाशिकरोड : देवळालीगाव राजवाडा येथील दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेला युवक विवेक देवीदास पगारे यांचा त्याच परिसरातील युवकांनी पूर्ववैमनस्यातून चाकूने गळ्यावर वार करून निर्घृणरीत्या खून केला. मृतदेह प्लास्टिकच्या गोणीमध्ये बांधून शौचालयाच्या टाकीत टाकून दिल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले आहे. देवळालीगाव राजवाडा येथील युवक विवेक देवीदास पगारे (२२) हा गेल्या शुक्रवारी (१३ फेब्रु.) रात्री ८ वाजेच्या सुमारास लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमाला जाऊन येतो असे सांगून घरातून गेला. मात्र त्यानंतर रात्री विवेक घरी न आल्याने शनिवारी वडील व इतर नातेवाइकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. परंतु विवेकचा कुठेच ठावठिकाणा लागत नसल्याने रात्री ११.३० वाजता नाशिकरोड पोलीस ठाण्यात विवेक बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली. रविवारी पोलीस व नातेवाईक बेपत्ता विवेकचा शोध घेत होते. दरम्यान, शुक्रवारी रात्री विवेक परिसरातील रितेश भालेराव, दीपक जाधव यांच्यासोबत असल्याचे विवेकचा भाऊ अभिजित व करण गांगुर्डे यांनी पोलिसांना सांगितले. विवेक भांडण झालेल्या रितेश व दीपक यांच्यासोबत असल्यामुळे हटकल्याचे अभिजित याने पोलिसांना सांगितले.विवेकचे वडील देवीदास पगारे यांनी सोमवारी सकाळी नाशिकरोड पोलीस ठाण्यात रितेश उर्फ राजन जनाजी भालेराव (वय २१), दीपक छगनराव जाधव (वय २२) यांच्या विरोधात फिर्याद देऊन संशय व्यक्त केला. रितेश व दीपक नेहमी मारहाण करायचे, दारू पिण्याकरिता पैसे मागायचे. या दोघांपासून माझ्या जीविताला धोका आहे, असे विवेकने आपल्याला यापूर्वीच सांगितल्याचे फिर्यादित म्हटले आहे.

Web Title: Bloodless murder by stabbing a knife through prejudice