चिखलओहोळ शिवारात तरुणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 01:09 IST2019-03-06T01:09:17+5:302019-03-06T01:09:39+5:30

मालेगाव : तालुक्यातील चिखलओहोळ शिवारात सुमारे ३५ वर्षे वयाच्या तरुणाचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी तालुका पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी केले आहे.

The blood of the youth in Chikhalohal Shivar | चिखलओहोळ शिवारात तरुणाचा खून

चिखलओहोळ शिवारात तरुणाचा खून

ठळक मुद्देअनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला.

मालेगाव : तालुक्यातील चिखलओहोळ शिवारात सुमारे ३५ वर्षे वयाच्या तरुणाचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी तालुका पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी केले आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावर मालेगावकडून धुळ्याकडे जाणाऱ्या बाजूस चिखलओहोळ शिवारात सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास ३५ ते ४० वर्ष वयोगटातील अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाचा चेहरा व छाती अर्धवट जळालेली असून, मयताच्या अंगावर जांभळ्या, पांढऱ्या रंगाचा रेषा असलेला फूल बाहीचा शर्ट, क्रीम रंगाची पॅण्ट व राखाडी रंगाची अंडरवेअर असून, उजव्या हातावर मनगटाच्या खाली पंजाच्यावरील बाजूस ओमचे चिन्ह गोंदलेले आहे. सदर इसमाचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याबाबत तालुका पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक शशिकांत शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक टकले, दुनगहू यांनी भेट देऊन पाहणी केली.

Web Title: The blood of the youth in Chikhalohal Shivar