चांदवड : तालुक्यातील वडबारे येथील ५५ वर्षीय महिलेचा अज्ञात व्यक्तीने खून करून शेतात फेकून दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.ठकूबाई धोंडीराम शिंदे (५५), रा. वडबारे या महिलेस अज्ञात इसमाने काहीतरी कारणावरून डोक्यावर व डोक्याच्या उजवे व डाव्या बाजूस हत्याराने गंभीर दुखापत करून ठार मारले. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने तिचा भाऊ अशोक पांडुरंग जाधव, रा. वडबारे यांच्या शेतातील घराच्या पाठीमागील मृतदेह बाजूस आणून टाकून दिला.याबाबतची खबर चांदवड पोलीसांना मिळताच पोलीस निरीक्षक अनंत मोहिते, पोलीस उपनिरीक्षक कैलास चौधरी, सहायक पोलीस उपनिरीक्षक राजू गोसावी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून शव नातलगांच्या ताब्यात दिले.
वडबारे येथील महिलेचा अज्ञात इसमाकडून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 23:32 IST