रक्त साठवणूक केंद्र मातांसाठी संजीवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 02:50 PM2020-02-28T14:50:54+5:302020-02-28T14:52:30+5:30

कळवण : - कळवणच्या उपजिल्हा रु ग्णालयाच्या सन २००६ च्या स्थापनेपासून आजपर्यंत ६५०० रक्तपिशव्यांचा रु ग्णांना पुरवठा केल्याने उपजिल्हा रु ग्णालय रु ग्णांना संजीवक ठरले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रु ग्णालयासाठीच्या नियमानुसार व अन्न व औषध प्रशासनाच्या रक्त साठवणूक केंद्र स्थापनेसाठी आवश्यक निकषांनुसार येथील उपजिल्हारु ग्णालयात २००६ साली केंद्र कार्यान्वित करण्यात आले .

 Blood storage center Diet for mothers | रक्त साठवणूक केंद्र मातांसाठी संजीवक

रक्त साठवणूक केंद्र मातांसाठी संजीवक

Next
ठळक मुद्देशासकीय रु ग्णालयात नसैर्गिक प्रसूती अधिक होत असल्या तरीही अपवादात्मक परिस्थितीत शस्त्रिक्र या (सिझेरियन) द्वारे प्रसूती करून मातेची प्रसूतीवेदनेपासून सुटका केली जात असल्याचे व त्यासाठी रक्त साठवणूक केंद्राची मदत होऊन सिझेरियन करणे सोपे होत असल्याचे स्त्री


कळवण:उपजिल्हा रु ग्णालयातील साठवणूक केंद्रात पुरेसा रक्तसाठा
 आदिवासी क्षेत्रातील या रु ग्णालयात रु ग्णसंख्या मोठी असून रु ग्णामध्ये पूरक आहाराचा अभाव , आरोग्यबाबतची उदासीनता यामुळे रक्तक्षयाचे प्रमाण अधिक आढळते . शेतीकामात व्यस्त असलेल्या माता बऱ्याच वेळा उशिराने रु ग्णालयात दाखल होत असतात . त्यातही रु ग्णालयापर्यंतचा गरोदर मातांचा प्रवास दुर्गम भागातील रस्त्यांमुळे खडतर होत असतो . रु ग्णालयात होणाº्या प्रसूतींमध्ये जोखमीच्या प्रसूतींचे प्रमाण अधिक आहे . प्रसूतीदरम्यान अधिकच्या रक्तस्रावामुळे माता दगावण्याची शक्यता वाढते . अशा वेळी रु ग्णालयातील रक्त साठवणूक केंद्र मातांसाठी संजीवक ठरत आहे.
. सिझेरियन करताना रक्त साठवणूक केंद्र आधारभूत ठरत असल्याचे भुलतज्ञ डॉ. सारिका चव्हाण यांनी सांगितले .
कळवण येथील हे केंद्र कळवण तालुल्यातीलच नाही तर कार्यक्षेत्राबाहेरील जवळच्या देवळा , डांगसौंदाणे ता सटाणा , खर्डे येथून संदिर्भत होणाºया मातांसाठी जीवनदायी सिद्ध होत आहे .
रक्त साठवणूक केंद्रास जिल्हा शासकीय रु ग्णालयातील रक्त पेढीतून रक्त पिशव्या उपलब्ध होत असतात . यासोबतच रु ग्णालयातील रक्तपेढी तंत्रज्ञ उदय बस्ते हे रक्त पिशव्यांचा साठा वाढविण्यासाठी प्रयत्न करत असतात .कळवण तालुका हा गुजरात राज्याच्या जवळ असल्याने रस्ते अपघातातील जखमींची संख्या मोठी असते , यास्तव परिसरातील नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे असे आवाहन रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी गौरव शितोळे यांनी केले आहे .वैद्यकीय अधीक्षकांच्या मार्गदर्शनानुसार व श्री गुरु दत्त शिक्षण संस्था मानूर तसेच विविध सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने एक कॅलेंडर वर्षात ६ शिबिरे आयोजित करण्यात येत असतात ज्यातून सरासरी ५०० रक्त पिशव्यांचे संकलन होत असते . 

Web Title:  Blood storage center Diet for mothers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.