मोबाईल चोरीचा संशय घेत मजूरांकडून इसमाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 14:07 IST2018-09-06T14:03:52+5:302018-09-06T14:07:47+5:30

The blood of laborers by suspected mobile theft | मोबाईल चोरीचा संशय घेत मजूरांकडून इसमाचा खून

मोबाईल चोरीचा संशय घेत मजूरांकडून इसमाचा खून

ठळक मुद्देगटार दुरूस्तीसाठी चार मजूरांना बोलाविलेया मारहाणीत गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू

नाशिक : कामटवाडे अंबड परिसरातील शांताई अपार्टमेंट येथे राहणाऱ्या गजानन सदाशिव भगत (२३) यांचे वडील मयत सदाशिव अजुर्न भगत (५५) यांनी गटार दुरूस्तीसाठी चार मजूरांना बोलाविले होते. यावेळी मजुरांनी मोबाईल फोन काम करताना गहाळ केला व त्याचा संशय सदाशिव यांच्यावर घेत त्यांना लाथाबुक्क्यांनी गंभीर मारहाण केली. या मारहाणीत गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. बुधवारी (दि.५) दुपारच्या सुमारास शांताई अपार्टमेंटच्या आवारात ही घटना घडली. या घटनेतील सर्व मजूर अनोळखी असल्याचे फिर्यादी गजानन यांनी पोलिसांना सांगितले. या मजूरांचा अद्याप थांगपत्ता लागला नसून अंबड पोलिसांनी संशयित मजुरांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपनिरिक्षक शेवाळे करीत आहेत.

Web Title: The blood of laborers by suspected mobile theft