चेतना नगरला आज रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:11 IST2021-07-18T04:11:54+5:302021-07-18T04:11:54+5:30

नाशिक : ‘लोकमत रक्ताचं नातं’ या उपक्रमांतर्गत रविवारी चेतनानगर येथील तिरुमला आशियाना अपार्टमेंट येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले ...

Blood donation to Chetna Nagar today | चेतना नगरला आज रक्तदान

चेतना नगरला आज रक्तदान

नाशिक : ‘लोकमत रक्ताचं नातं’ या उपक्रमांतर्गत रविवारी चेतनानगर येथील तिरुमला आशियाना अपार्टमेंट येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

‘लोकमत’तर्फे ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी आणि ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित ‘लोकमत रक्ताचं नातं’ या अभिनव उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शनिवारी दसक गावातील राजवाडा परिसरात झालेल्या रक्तदान शिबिरात १५ पिशव्या रक्तसंकलन करण्यात आले. यावेळी नगरसेवक प्रशांत दिवे, नगरसेवक दिनकर आढाव, नगरसेवक विशाल संगमनेरे, मंगला आढाव, संतोष कांबळे, संतोष पिल्ले, सागर भोजने, भारत निकम, अनिल गांगुर्डे, योगेश नसाळ, आदी उपस्थित होते.

फोटो (१७दसक)

दसक गावातील रक्तदानप्रसंगी उपस्थित नगरसेवक दिनकर आढाव आणि अन्य पदाधिकारी.

Web Title: Blood donation to Chetna Nagar today