रक्तदान महायज्ञात सिन्नरकरांनी जपलं रक्ताचं नातं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 00:54 IST2021-07-14T23:55:02+5:302021-07-15T00:54:54+5:30
सिन्नर: ह्यलोकमतह्ण व रोटरी क्लब सिन्नरच्या संयुक्त विद्यमाने येथील मातोश्री हॉस्पीटलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरास सिन्नरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रक्तदात्यांनी शिबीरात सहभाग नोंदवत रक्ताचं नांत अधिक दृढ करीत राज्यभर सुरु असलेल्या उपक्रमाचे कौतूक केले.

सिन्नर येथे लोकमत व रोटरी क्लबच्यावतीने आयोजित रक्तदान शिबीरात सहभागी झालेल्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
सिन्नर: ह् लोकमत व रोटरी क्लब सिन्नरच्या संयुक्त विद्यमाने येथील मातोश्री हॉस्पीटलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरास सिन्नरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रक्तदात्यांनी शिबीरात सहभाग नोंदवत रक्ताचं नांत अधिक दृढ करीत राज्यभर सुरु असलेल्या उपक्रमाचे कौतूक केले.
सिन्नरच्या प्रांताधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार राहुल कोताडे, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, रोटरी क्लबचे अध्यक्ष वैभव मुत्रक, कैलास क्षत्रिय यांच्याहस्ते स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करुन शिबीराचे उद्घाटन केले. नाशिक ब्लड बॅँकच्या वैद्यकीय पथकाने तपासणी केली.
रोटरी क्लबचे सदस्य, राजकीय कार्यकर्ते, कामगार, पोलीस, अधिकारी यांनी रक्तदान शिबीरात आपला सहभाग नोंदविला. यावेळी माजी आमदार राजाभाऊ वाजे, तालुका कॉँग्रेसचे अध्यक्ष विनायक सांगळे, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, राष्टÑवादी कॉँग्रेसचे राजाराम मुरकुटे, नामदेव कोतवाल, डॉ. गणेश सांगळे, सिन्नर ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. वर्षा लहाडे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दीपक खुळे, माजी उपनगराध्यक्ष अजित पहिलवान, महेश नाईक, सागर मुत्रक यांच्यासह मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. शिबीर यशस्वीतेसाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष वैभव मुत्रक, सचिव नाना भगत, खजिनदार सुयोग कानडे, कैलास क्षत्रिय, उदय गायकवाड, संजय आणेराव, निशांत माहेश्वरी, संजय आव्हाड, दत्ता गोळेसर, प्रमोद सिंग, राहुल दराडे यांच्यासह ह्यलोकमतह्णचे तालुका प्रतिनिधी शैलेश कर्पे, कृष्णा वावधाने, गणेश पगार यांनी परिश्रम घेतले.
सिन्नर येथे लोकमत व रोटरी क्लबच्यावतीने आयोजित रक्तदान शिबीराचे स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करुन उद्घाटन करतांना प्रांताधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार राहुल कोताडे, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, रोटरी क्लबचे अध्यक्ष वैभव मुत्रक, कैलास क्षत्रिय, उदय गायकवाड, नाना भगत, सुयोग कानडे, डॉ. गणेश सांगळे, दत्ता गोळेसर, संजय आणेराव, निशांत माहेश्वरी, संजय आव्हाड आदि सिन्नरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.