येवल्यात मालवाहतूक संघटनेचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 18:26 IST2021-07-05T18:24:43+5:302021-07-05T18:26:21+5:30
येवला : येथील मालवाहतूक संघटना, क्रांतिकारी ड्रायव्हर कामगार संघटना व महाराष्ट्र खाजगी वाहन चालक बहुउद्देशीय महासंघ यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी शहरातील विंचूर चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

येवला येथे मालवाहतूक करणाऱ्या चालक, मालकांनी विविध मागण्यांसाठी केलेल्या रास्ता रोकोप्रसंगी बोलताना सुधाकर पाटोळे.
येवला : येथील मालवाहतूक संघटना, क्रांतिकारी ड्रायव्हर कामगार संघटना व महाराष्ट्र खाजगी वाहन चालक बहुउद्देशीय महासंघ यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी शहरातील विंचूर चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
सोमवारी सकाळी ११ वाजता सुधाकर पाटोळे, पोपटराव आहेर, अण्णासाहेब जावळे यांच्या नेतृत्वाखाली मालवाहतूक करणारे चालक रस्त्यावर उतरले. रास्ता रोकोमुळे महामार्गावरील वाहतूक दुर्तफा ठप्प झाली होती. याप्रसंगी पाटोळे, आहेर, जावळे यांची भाषणे झाली. आंदोलनकर्त्यांच्या वतीने सहायक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे यांना निवेदन देण्यात आले.
आंदोलनात परेश परदेशी, रमेश मोहन, बबन मांजरे, राजू भागवत, गोरख शिंदे, बापू गवळी, देवा गवळी, अमजद पठाण, अनू भावसार, संदीप शिनगर, नवनाथ सांबरे, पांडू दराडे, संतोष पाबळे, दीपक पैठणकर, संजय जेजूरकर, असलम शहा, ज्ञानेश्वर सैद आदींसह चालक, मालक सहभागी झाले होते.
या आहेत मागण्या...
केंद्र सरकारने दीड वर्षापासून वाहनधारकांना कागदपत्राची माफी दिलेली असताना देखील आरटीओ हे रोडवर बेकायदेशीर दंड वसूल करतात व विनाकारण त्रास देतात, हे थांबवा. एसटी महामंडळ बेकायदेशीर मालवाहतूक करीत असूनदेखील त्यांच्यावर कुठल्याही प्रकारे कार्यवाही होत नाही. स्थानिक पोलीस सोडून बाहेरील पोलिसांचा अतोनात त्रास होतो, हे थांबवा. डिझेल व पेट्रोलच्या किमतीत होणारी भरमसाठ दरवाढ थांबवावी व दर कमी करावेत, पासिंगसाठी जुने दर ठेवण्यात यावे, टोल नाक्यावरील वाढलेले दर कमी करण्यात यावे, आदी मागण्या सदर निवदेनात करण्यात आल्या आहेत.