इगतपुरीत आदिवासी सेनेचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:11 IST2021-06-26T04:11:29+5:302021-06-26T04:11:29+5:30

इगतपुरी : मुंबई येथील दादर रेल्वे स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे, नवी मुंबई येथील विमानतळाला दि. बा. पाटील यांचे ...

Block the way of Adivasi Sena in Igatpuri | इगतपुरीत आदिवासी सेनेचा रास्ता रोको

इगतपुरीत आदिवासी सेनेचा रास्ता रोको

इगतपुरी :

मुंबई येथील दादर रेल्वे स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे, नवी मुंबई येथील विमानतळाला दि. बा. पाटील यांचे तर नाशिक विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीने महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

आदिवासी सेनेचे संस्थापक अध्यक्ष दि. ना. उघाडे यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरी बोरटेंभे शिवारात राष्ट्रीय महामार्गावर दि. २५ रोजी शासनाच्या निषेधार्थ लक्षवेधी आंदोलन करून तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन देण्यात आले.

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष करून राज्य व केंद्र सरकार जातीय तेढ निर्माण करीत आहे. येत्या १५ दिवसात दादर रेल्वे स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर नामांतराबरोबरच प्रलंबित मागण्या पूर्ण केल्या नाही तर कोणत्याही क्षणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आघाडी सरकारच्या संबंधित मंत्र्यांना जनता घेराव घालून जाब विचारल्याशिवाय राहणार नाही असे निवेदनात नमूद आहे. याप्रसंगी भावना केदारे, अनुसया आगीवले, अनिल साळवे, राजू दोंदे, पंडित गांगुर्डे, संकेत निकाळे, सोमा आगीवले, आरवी जासवाल, सुमन वारघडे, नामदेव भडांगे, रूपेश जोशी, नितीन वालझाडे, शैला पगारे, मनिषा घुले, निता निरगुंडे, छाया गवळी, रानू गवळे, तावडे, नंदू उबाळे, मंगला पवार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

-------------------

इगतपुरीत रास्ता रोको करून तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन देताना दि. ना. उघाडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते. (२५ इगतपुरी)

===Photopath===

250621\25nsk_7_25062021_13.jpg

===Caption===

२५ इगतपुरी

Web Title: Block the way of Adivasi Sena in Igatpuri