कांदा निर्यात बंदी विरुद्ध राष्ट्रवादीचे रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 00:56 IST2020-09-15T22:32:52+5:302020-09-16T00:56:40+5:30

नाशिकरोड : केंद्र शासनाने कांद्यावर लागू केलेली निर्यातबंदी त्वरित मागे घ्यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे गाव टोल नाका येथे मंगळवारी दुपारी मोदी शासनाच्या निषेधार्थ घोषणा देत निदर्शने करुन रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

Block the NCP's path against onion export ban | कांदा निर्यात बंदी विरुद्ध राष्ट्रवादीचे रास्ता रोको

नाशिक पुणे महामार्ग शिंदे टोलनाका कांदा निर्यात उठवावी मागणी साठी आंदोलन करताना जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तम कडलक, तालुका अध्यक्ष गणेश गायधनी रमेश औटे, सातपुते, बाळासाहेब तुंगार, गणपत गायधनी, रामकृष्ण गायखे, निखिल भागवत आदी. टीप आंदोलनाचा फोटो एन एस के एडिट पाठवला आहे

ठळक मुद्देकेंद्र सरकारचा निषेध: बेमुदत चक्का जामचा इशारा

नाशिकरोड : केंद्र शासनाने कांद्यावर लागू केलेली निर्यातबंदी त्वरित मागे घ्यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे गाव टोल नाका येथे मंगळवारी दुपारी मोदी शासनाच्या निषेधार्थ घोषणा देत निदर्शने करुन रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलक, तालुकाध्यक्ष गणेश गायधनी यांच्या नेतृत्वाखाली नाशिक पुणे महामार्गावरील शिंदे टोल नाका येथे केंद्र शासनाने लागू केलेली कांदा निर्यात बंदी त्वरित मागे घेण्यात यावी या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन केले.केंद्र शासनाने कांद्याला चांगल्या प्रकारचा भाव मिळत असतानाच निर्यात बंदी केली. देशाचा जीडीपी मायनस २४ मध्ये गेला असताना कांद्याच्या निर्यात बंदीमुळे शेती उद्योगामुळे जीडीपी ला उभारी मिळणार होती ती देखील या निर्णयामुळे मिळणार नाही. सर्वसामान्य शेतकरी कोरोना परिस्थितीमध्ये देशोधडीला लागलेला आहे. थोडेफार उत्पन्न कांद्याच्या माध्यमातून त्यांना मिळणार होतं. परंतु केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यावरती मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. नाशिक जिल्हा हा देशात एक नंबर कांदा उत्पादक असून नाशिक जिल्'ातील खासदारांनी लोकसभेचे अधिवेशनामध्ये कांदा निर्यात बंदी उठवावी याची आक्रमक भूमिका मांडली पाहिजे आणि तातडीने याबाबतचा निर्णय केंद्र शासनाकडून घेतला पाहिजे. केंद्र शासनाने हा निर्णय शेतकर्यांवरती द्वेषभावनेने घेतला असून केंद्र शासनाने ताबडतोब हा निर्णय रद्द करावा, अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाभरात चक्का जाम आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला. आंदोलनात रमेश औटे, मधुकर सातपुते, बाळासाहेब तुंगार,गणपत गायधनी, रामकृष्ण गायखे, स्वप्नील चुंबळे, संदीप ढेरे, विजू गांगुर्डे, शांताराम झोरे, सौरभ आहिरे, माणिकराव कडलक, प्रफुल्ल पवार, महेश शेळके, निखिल भागवत, मनोज गायधनी, श्रीकांत टावरे, वैभव झाडे, तुषार शिंदे, महेश रोकडे, सोनू ठोंबरे, सागर थेटे, आकाश भागवत आदी सहभागी झाले होते होते.
 

 

Web Title: Block the NCP's path against onion export ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.