उघड्यावरील गरजुंना ब्लॅँकेटचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 17:40 IST2018-12-18T17:38:57+5:302018-12-18T17:40:15+5:30
पिंपळगाव बसवंत : शहरात व्यवसाय निमित्ताने आलेल्या दगडाला आकार देऊन पाटे-वरवटे घडवणाऱ्या व उघड्यावर वास्तव्य करणाºया कुटुंबांना सामाजिक बांधिलकी जपत येथील ‘जेसीआय ग्रेप टाऊन’ या सामाजिक संस्थेच्या मार्फत ब्लँकेट वाटप करण्यात आले.

गरजू कुटुंबाना ब्लँकेट वाटप करतांना जेसीआय ग्रेप टाऊन संस्थेचे पदाधिकारी व सदस्य.
पिंपळगाव बसवंत : शहरात व्यवसाय निमित्ताने आलेल्या दगडाला आकार देऊन पाटे-वरवटे घडवणाऱ्या व उघड्यावर वास्तव्य करणाºया कुटुंबांना सामाजिक बांधिलकी जपत येथील ‘जेसीआय ग्रेप टाऊन’ या सामाजिक संस्थेच्या मार्फत ब्लँकेट वाटप करण्यात आले.
निफाड तालुक्यात तापमानाचा पारा ७.२ पर्यंत घसरलेला आहे. त्यात बागायती शेतीने वेढल्याने थंडीच्या पाºयाने नीचांक गाठले आहे. त्यामुळे चांगलीच थंडीची हुडहुडी पसरलेली आहे. शहरात व्यवसायानिमित्ताने आलेले अनेक कुटुंब उघड्यावर रहात असल्याने पिंपळगाव बसवंत येथील सदर संस्थेतर्फे गरजू कुटुंबांना ब्लँकेट वाटप करून सामाजिक संदेश दिला आहे.
जेसीआय चे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सुधीर भांबर यांनी आरोग्य बाबत घ्यावयाची काळजी, महिला सबलीकरण, अंधश्रद्धा निर्मूलन आदी विषय वर चर्चा करून जनजागृती केली. यावेळी केशव बनकर, डॉ. संदीप वाघ, डॉ गोरख कागदे, डॉ संजय शिंदे, प्रशांत मोरे, सुधाकर कापडी, नंदू सोनवणे, पांडुरंग दवंगे, श्रीनिवास गायकवाड, ज्ञानेश्वर उगले आदींसह पदाधिकारी व सदस्य उपस्थीत होते.