शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या शवविच्छेदनगृहात राहून सुरू होता बनावट प्रमाणपत्रांचा काळाबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 16:26 IST

नाशिक जिल्हा रुग्णालयातील प्रशासकीय शिक्क्यांसह अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांची प्रतिकृती तयार करून बेकायदेशीर रीत्या विविध प्रकारचे वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याचा काळाबाजार उघडकीस आला असून विशेष म्हणजे या प्रकरणातील संशयित आरोपी मंगळे साळवे व त्याचा अज्ञात साथीदार रुग्णालयाच्या शवविच्छेदनगृहात राहूनच हा सर्व प्रकार करीत असल्याचे समोर आले असून या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात मंगळे साळवे सह त्याच्या अज्ञात साथिदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय प्रमाणपत्रांचा काळाबाजार संशयित आरोपीकडे आढळला बनावट शिक्के कोऱ्या प्रमाणपत्रांचा साठारुग्णालय अधीक्षकांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील प्रशासकीय शिक्क्यांसह अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांची प्रतिकृती तयार करून बेकायदेशीर रीत्या विविध प्रकारचे वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याचा काळाबाजार उघडकीस आला असून विशेष म्हणजे या प्रकरणातील संशयित आरोपी मंगळे साळवे व त्याचा अज्ञात साथीदार रुग्णालयाच्या शवविच्छेदनगृहात राहूनच हा सर्व प्रकार करीत असल्याचे समोर आले असून या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात मंगळे साळवे सह त्याच्या अज्ञात साथिदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणीतील आरोपीने आपल्या ताब्यात एका बॅगमध्ये जिल्हा शल्य चिकित्सक नाशिक यांचा गोल रबरी स्टॅम्प,  एक आडवा रबरी स्टॅम्प, तसेच अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांचा एक आडवा रबरी स्टॅम्प या सोबत कोऱ्या वैदयकीय प्रमाणपत्रांचा गठ्ठा असल्याचा मिळून आला आहे. रबरी स्टॅम्पसह हे सर्व साहित्य आरोपीने बेकायदेशीररीच्या वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी आपल्या अज्ञात साथीदाराच्या मदतीने तयार करून आपल्या कब्जात बाळगले म्हणून  रुग्णालय अधीक्षक नानासाहेब  निकम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार  शुक्रवारी (दि.१५) पोलिसांनी या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयाचा चा शिक्का रुग्णालया प्रशासनाबाहेरील व्यक्तीकडे आढळल्याने एकच खळबळ उडाली असून, या शिक्क्यांचा विविध कारणांसाठी गैरवापर झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालय प्रशासनाबाहेरील व्यक्तीकडे आढळलेले शिक्के हे बनावट असून, त्याने बाजार पेठेतील शिक्के तयार करणाऱ्या कारागिराकडून तयार करून घेतल्याचा संशय जिल्हा प्रशानाने व्यक्त केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरPoliceपोलिस