नाशिकरोड प्रभागात सभापतिपदी भाजपाच्या सातभाई
By Admin | Updated: May 20, 2017 02:07 IST2017-05-20T02:06:28+5:302017-05-20T02:07:28+5:30
नाशिकरोड : मनपा नाशिकरोड प्रभाग सभापतीपदी भाजपाच्या सुमन सातभाई यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

नाशिकरोड प्रभागात सभापतिपदी भाजपाच्या सातभाई
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिकरोड : मनपा नाशिकरोड प्रभाग सभापतीपदी भाजपाच्या सुमन सातभाई यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सातभाई यांच्या रूपाने पहिल्यांदाच नाशिकरोडला भाजपचा सभापती झाला आहे. निवडीप्रसंगी शिवसेनेचे सर्व नगरसेवक गैरहजर होते.
मनपा नाशिकरोड प्रभाग सभापती पदाची निवडणूक शुक्रवारी दुपारी ४ वाजता प्रभाग सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी अप्पर आयुक्त ज्योतिबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नगरसचिव अशोक वाघ, विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. नाशिकरोड विभागांत २३ पैकी १२ नगरसेवक भाजपाचे असल्याने बहुमत आहे. सभापती पदासाठी नगरसेविका सुमन सातभाई यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी ज्योतिबा पाटील यांनी घोषित केले. यावेळी भाजपा गटनेता संभाजी मोरूस्कर, दिनकर आढाव, शरद मोरे, पंडित आवारे, अंबादास पगारे, विशाल संगमनेरे, सरोज आहिरे, संगीता गायकवाड, डॉ. सीमा ताजणे, कोमल मेहरोलिया, मीराबाई हांडगे आदि उपस्थित होते. शिवसेनेचे ११ नगरसेवक यावेळी गैरहजर होते .