शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

महापालिकेत भाजपचेच बंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 23:11 IST

नाशिक : पाच वर्षांपूर्वी झालेल्या कुंभमेळ्यातील पाणीपुरवठा व अन्य कामांच्या सुमारे १७ कोटी रुपयांची बिले देण्याच्या प्रस्तावाला महापौर सतीश कुलकर्णी यांनी मंजुरी दिली खरी; परंतु त्यातून भाजपअंतर्गत वाद पेटला आहे. महापौरांच्या निर्णयाला भाजपतील काही नगरसेवकांनी आव्हान दिले आहे. भाजपच्या २२ नगरसेवकांनी नगरसचिवांना पत्र दिले आहे. त्यामुळे भाजपतील अंतर्गत खदखद बाहेर आली आहे.

ठळक मुद्देसिंहस्थातील बिलांचे प्रकरण : महापौरांच्या निर्णयाला आक्षेप

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पाच वर्षांपूर्वी झालेल्या कुंभमेळ्यातील पाणीपुरवठा व अन्य कामांच्या सुमारे १७ कोटी रुपयांची बिले देण्याच्या प्रस्तावाला महापौर सतीश कुलकर्णी यांनी मंजुरी दिली खरी; परंतु त्यातून भाजपअंतर्गत वाद पेटला आहे. महापौरांच्या निर्णयाला भाजपतील काही नगरसेवकांनी आव्हान दिले आहे. भाजपच्या २२ नगरसेवकांनी नगरसचिवांना पत्र दिले आहे. त्यामुळे भाजपतील अंतर्गत खदखद बाहेर आली आहे.महापौर सतीश कुलकर्णी यांनी गेल्या १८ जून रोजी आॅनलाइन महासभा घेतली. यावेळी सिंहस्थातील ज्या कामांना मंजूर खर्चापेक्षा अधिक टक्केकिंवा त्यापेक्षा अधिक खर्च झाला आहे अशी देयके अदा करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. गेल्या पाच महासभांमध्ये हा विषय तहकूब होता. सिंहस्थ संपल्यानंतर आता पाच वर्षे झाल्यानंतर इतक्या विलंबाने हा विषय प्रशासनाने का मांडला, ज्यावेळी खर्च वाढला त्याचवेळी वाढीव खर्चास मंजुरी का घेण्यात आली नाही असे अनेक प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केला होता. भाजपचे संभाजी मोरुस्कर यांनी, तर पक्ष नगरसेवकांच्या बैठकीत हा विषय नामंजूर करण्याचे ठरल्याने त्यानुसारच हा प्रस्ताव फेटाळण्याची मागणी केली होती. मात्र, त्यानंतरदेखील महापौरांनी हा प्रस्ताव मंजूर केला, तर संबंधित प्रस्ताव रखडल्याने १६ जलकुंभाची कामे रखडल्याने हा प्रस्ताव मंजूर करावा लागला, असे कारण नंतर महापौरांनी दिले होते.आता यासंदर्भात माजी गटनेते संभाजी मोरुस्कर, ज्येष्ठ नगरसेवक दिनकर आढाव, विशाल संगमनेरे, अजिंक्य साने, सुमन सातभाई, पुष्पा आव्हाड यांच्यसह २२ नगरसेवकांनी नगरसचिवांना पत्र दिले असून, हा प्रस्ताव मंजूर करण्यास विरोध असल्याचे नमूद केले आहे.शिवसेनेतही मतभेद, पण...गेल्या १८ जून रोजी झालेल्या महासभेत भाजपप्रमाणेच शिवसेनेतील मतभेददेखील उघड झाले होते. सिंहस्थाच्या याच कामास नामंजूर करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केली तर आपल्या प्रभागातील पाणीप्रश्न असल्याने हा प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी शिवसेनेचेच सुधाकर बडगुजर यांनी केली होती. विशेष म्हणजे नंतर त्यांनी आपला या विषयाबाबत संभ्रम होता. कारण महासभा पूर्व पक्ष नगरसेवकांची बैठकच होत नसल्याचा दावा त्यांनी केला होता, तर बोरस्ते यांनी पत्रकारांशी बोलताना त्याचे खंडन केले होते.

टॅग्स :BJPभाजपाNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका