अण्णा हजारे कार्यकर्त्यांकडून भाजपाचा निषेध

By Admin | Updated: February 5, 2015 00:19 IST2015-02-05T00:19:07+5:302015-02-05T00:19:16+5:30

अण्णा हजारे कार्यकर्त्यांकडून भाजपाचा निषेध

BJP's protest from Anna Hazare activists | अण्णा हजारे कार्यकर्त्यांकडून भाजपाचा निषेध

अण्णा हजारे कार्यकर्त्यांकडून भाजपाचा निषेध

नाशिक : दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारात अण्णा हजारे यांच्या प्रतिमेला हार घातल्याचे व्यंगचित्र प्रसिद्ध करणाऱ्या दिल्ली भारतीय जनता पार्टीचा भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन समितीच्या वतीने निषेध करण्यात आला.
यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन, महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीदिनी भाजपाने हजारे यांच्या प्रतिमेला हार घालून देशातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. भाजपाने अशा प्रकारे घाणेरडे राजकारण सुरू केल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी शिवाजी कोठुळे, हेमंत कवडे, प्रशांत देशमुख, निशिकांत पगारे, भाऊसाहेब गडाख आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: BJP's protest from Anna Hazare activists