येवल्यात भाजपचे घंटानाद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 17:25 IST2020-08-29T17:25:17+5:302020-08-29T17:25:57+5:30
येवला : मंदिरे खुली करा या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले.

येवल्यात भाजपचे घंटानाद आंदोलन
येवला : मंदिरे खुली करा या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले. हिंदुत्वाच्या नावावर मते मागणारे सरकारचे नेतृत्व हिंदू संस्कृतीची उघड उघड गळचेपी करत असल्याचा आरोप यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी केली. श्री वनवासी राममंदिर येथे झालेल्या सदर घंटानाद आंदोलनात नगराध्यक्ष बंडू पहिलवान क्षीरसागर, शहराध्यक्ष तरंग गुजराथी, नगरसेवक प्रमोद सस्कर, सरचिटणीस बापू गाडेकर, सुकृत पाटील, राधेश्याम परदेशी, कुणाल क्षीरसागर, मनोज दिवटे, राजू परदेशी, किशोर परदेशी, सुनील बाबर, कुंदन हजारे, पंकज पहिलवान, विशाल काथवटे, बाबू खानापुरे, सुजित खानापुरे, बाळू साताळकर, किरण कायस्थ आदी सहभागी झाले होते.