महाविकास आघाडी विरुद्ध भाजप होणार लढत प्रभाग निवडणूक: राजकिय समीकरणे बदलणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 00:09 IST2020-10-07T23:36:56+5:302020-10-08T00:09:48+5:30
नाशिक: महापालिकेच्या प्रभाग सभापती पदाची निवडणूक जाहीर होताच राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून, राज्यातील बदललेल्या राजकीय हवामानाचा विचार करता महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशीच लढाई होणार आहे.

महाविकास आघाडी विरुद्ध भाजप होणार लढत प्रभाग निवडणूक: राजकिय समीकरणे बदलणार
नाशिक: महापालिकेच्या प्रभाग सभापती पदाची निवडणूक जाहीर होताच राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून, राज्यातील बदललेल्या राजकीय हवामानाचा विचार करता महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशीच लढाई होणार आहे.
नाशिक महापालिकेत सत्तारूढ भाजपचे स्पष्ट बहुमत असले तरी सहा प्रभाग समित्यांपैकी दोन समित्यांवर विरोधक शिवसेनेचे वर्चस्व आहे. २३ सदस्यीय पंचवटी प्रभाग समितीत भाजपचे सर्वाधिक १८, शिवसेनेचे ११ तर राष्टÑवादीचा १ सदस्य आहे. स्पष्ट बहुमतामुळे या समितीवर पुन्हा एकदा भाजपचा सभापती होईल. १९ सदस्यीय नाशिक पूर्व प्रभाग समितीत भाजपचे सर्वाधिक १२, राष्टÑवादी ४ , कॉँग्रेस २, अपक्ष १ असे बलाबल आहे. स्पष्ट बहुमत असल्याने ही समिती पुन्हा भाजपच्याच ताब्यात जाणार हे स्पष्टआहे. २४ सदस्यीय नवीन नाशिक प्रभाग समितीत शिवसेनेचे र्वचस्व आहे. याठिकाणी शिवसेनेचे १४ तर भाजपचे ९, राष्टÑवादीचा एक सदस्य आहे. २३ सदस्यीय नाशिकरोड प्रभाग समितीत शिवसेना व भाजपचे समसमान ११ बलाबल आहे तर राष्टÑवादीचा एक सदस्य आहे. १२ सदस्यीय नाशिक पश्चिम प्रभाग समितीत कॉग्रेसचे सर्वाधिक पाच, शिवसेना, राष्टÑवादी मनसे, प्रत्येकी एक तर कॉगे्रसचे चार सदस्य आहेत. महाविकास आघाडीच्या वर्चस्वामुळे ही समिती महाविकास आघाडीच्याच ताब्यात राहण्याची शक्यता आहे. २० सदस्यीय सातपूर प्रभाग समितीत भाजपचे ९, शिवसेना ८, मनसे २ तर आरपीआय(अ) १ असे बलाबल आहे. प्रभाग सभापतीपदाच्या या निवडणुकांमध्ये भाजप विरुध्द महाविकास आघाडी असा संघर्ष पाहायला मिळणार आहे.