हिंसाचाराचा येवल्यात भाजपकडून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 01:06 IST2021-05-05T22:45:41+5:302021-05-06T01:06:10+5:30

येवला : पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या हिंसाचाराचा येवला शहर भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चाने निषेध नोंदविला आहे.

BJP protests violence in Yeola | हिंसाचाराचा येवल्यात भाजपकडून निषेध

हिंसाचाराचा येवल्यात भाजपकडून निषेध

ठळक मुद्देराजकीय हिंसाचाराचा भाजप निषेध

येवला : पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या हिंसाचाराचा येवला शहर भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चाने निषेध नोंदविला आहे.

पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण राज्यभर हिंसाचार सुरू केला असल्याने, या राजकीय हिंसाचाराचा भाजप निषेध करत असल्याचे यावेळी बोलताना शहराध्यक्ष तरंग गुजराथी, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, नगरसेवक प्रमोद सस्कर यांनी सांगितले.

याप्रसंगी संघटन सरचिटणीस बापू गाडेकर, ज्येष्ठ नेते विजय श्रीश्रीमाळ, राधेश्याम परदेशी, कुंदन हजारे, संकेत वाडेकर, सौरभ बाकळे, बाबू खानापुरे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, भाजप युवामोर्चानेही जिल्हा उपाध्यक्ष मयूर मेघराज यांचे नेतृत्वाखाली पश्‍चिम बंगालमधील हिंसाचाराचा निषेध नोंदविला. याप्रसंगी ललित वखारे, वैष्णव पवार, ऋषी शहारे, हेमंत सांबर आदी उपस्थित होते.
(०५ येवला)

Web Title: BJP protests violence in Yeola