शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

संघटनात्मक निवडणुकांआडून भाजपची मध्यावधीची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 12:26 AM

राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच वाढला असतानाच भाजपने संघटनात्मक निवडणुकीच्या नावाखाली सार्वत्रिक निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. नाशिकमध्ये संघटनेच्या निवडणुकांसाठी मंडल स्तरावर आणि अन्य बैठका घेतल्या जात असतानाच कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना केल्या जात आहेत.

नाशिक : राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच वाढला असतानाच भाजपने संघटनात्मक निवडणुकीच्या नावाखाली सार्वत्रिक निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. नाशिकमध्ये संघटनेच्या निवडणुकांसाठी मंडल स्तरावर आणि अन्य बैठका घेतल्या जात असतानाच कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना केल्या जात आहेत.विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका शिवसेना भाजपने युती म्हणून लढविल्या मात्र त्याचवेळी उभय पक्षांत खदखद दिसून येत होते. भाजपने उमेदवारी नाकारलेल्या माजी आमदाराला भेटणे आणि त्याला नंतर पक्षात प्रवेश देणे त्यामागे संजय राऊतच होते. परंतु त्यानंतर नाशिक पश्चिममध्येदेखील शिवसेनेने बंडखोर उमेदवाराला पुरस्कृत केले आणि नंतर रसद पुरवली होती.राज्यात सत्ता येण्याची चिन्हे दिसत असतानाच कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळाल्यानंतर मुख्यमंत्रिपदावरून घोडे आडले. आता तर शिवसेना आणि कॉँग्रेस आघाडी यांच्यात सत्ता स्थापनेच्या चर्चा सुरू आहेत. त्यात काय होईल हे अद्याप स्पष्ट नसले तरी विधानसभा निवडणुका पुन्हा होण्याची शक्यता आहे. भाजपने त्यादृष्टीने तयारी आरंभली आहे.उद्दिष्टपूर्तीचे आवाहनराज्यात सध्या उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेची मागणी कशी अव्यवहार्य होती आणि भाजपने काय भूमिका घेतली, याबाबत बैठकीत कार्यकर्त्यांना अवगत केले जात आहे. गेल्यावेळी पक्षाने नाशिक शहरात तीन लाख सभासद केले होते. त्यानंतर यंदा पंचवीस टक्के अधिक वृद्धी अपेक्षित असून, त्यादृष्टीने कुठल्याही परिस्थितीत उद्दिष्टपूर्ती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.दर तीन वर्षांनी भाजपच्या संघटनात्मक निवडणुका होतात. त्यानिमित्ताने सभासद नोंदणी आणि अन्य कामे होत असली तरी यंदा मध्यावधीचा विचार करून भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. वार्ड समित्या आणि मंडलांच्या बैठकांमध्ये यासंदर्भात चर्चा सुरू केल्या आहेत. मध्यावधी निवडणुका कधीही लागू शकतात. त्यामुळे सज्ज राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

टॅग्स :BJPभाजपाElectionनिवडणूकPoliticsराजकारण