शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची वारंवार मागणी; पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 09:06 IST

भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याविषयी आपली भूमिका मांडली आहे.

BJP Pankaja Munde: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि पवनचक्की खंडणी प्रकरणात होत असलेल्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी होत आहे. याबाबत आता भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका मांडली आहे. "बीडमधील संतोष देशमुख हत्याकांडाचा मी अनेकदा निषेधच केला आहे. संपूर्ण प्रकरण सरकार संवेदनशील पद्धतीने हाताळत असून, या प्रकरणातून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायचा की नाही? हा निर्णय मुख्यमत्री व दोघे उपमुख्यमंत्रीच घेतील," असं मत पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं आहे.

श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट (दिंडोरी) तसेच कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी महोत्सवाला भेट देण्यासाठी पंकजा मुंडे रविवारी नाशिक येथे गेल्या होत्या. त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, "आमदार सुरेश धस यांच्याशी माझे वैर नाही. गणेशोत्सवात वापरण्यात येणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरीस मूर्तीच्या अनुषंगाने आम्ही बैठक घेतली असून, विधी आणि न्याय विभागाचे मार्गदर्शन मागवले आहे. लवकरच याबाबत अंतिम निर्णय होईल," असेही त्या म्हणाल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे. आपण त्यांना शुभेच्छा देणार काय? असा प्रश्न पंकजा मुंडे यांना केला असता आमच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी कायम असतील. ते लाडक्या बहिणींचे भाऊ आहे, असेही त्यांनी सांगितले.

बिल्डरांना दिला इशाराबांधकाम करण्याआधी पर्यावरण विभागाची परवानगी लागते.बांधकामाच्या आधी त्या ठिकाणी झाडे लावा अन्यथा कारवाईस सामोरे जा, असा इशाराच पंकजा मुंडे यांनी दिला. जनता मुंडे साहेबांवर प्रेम करणारी आहे. मला मुंडे साहेबांचा वारसा मिळाला म्हणून लोकांनी स्वीकारलं, अशी प्रांजळ कबुलीदेखील पंकजा मुंडे यांनी दिली.

प्रयागराजला जाणारमी अंधश्रद्धाळू अजिबातच नाही. मात्र, मी श्रद्धाळू आहे. प्रयागराजमध्ये अनेक तपस्वी आले आहेत. त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी तिथे जायचे आहे. मात्र, काही लोक फक्त कुंभ पाहायला जातात. ग्रीन एनर्जीवर जास्तीत जास्त प्रकाश टाकण्याचा आमचा मानस असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेDhananjay Mundeधनंजय मुंडेBJPभाजपाbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरण