शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये भाजपा आमदार देवयानी फरांदे यांची पोस्ट!

By संजय पाठक | Updated: July 18, 2024 11:17 IST

विरोध करणाऱ्या पक्ष प्रवक्त्यालाच केले रिमूव्ह

नाशिक-काँग्रेस पक्षाच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या कार्यक्रमाची पोस्ट टाकल्यानंतर पक्षाचे प्रवक्ते दर्शन पाटील यांनी त्यास आक्षेप घेतला त्यामुळे त्यांना या ग्रुप मधूनच रिमूव करण्यात आले आहे या संदर्भात त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे तक्रार केली आहे.

अर्थात काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष ऍड आकाश छाजेड यांचे माजी।आमदार स्व. जयप्रकाश छाजेड यांच्या वडिलांच्या नावाने साकारण्यात आलेल्या  उद्यानाचे लोकार्पण आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते होणार असल्याची ती पोस्ट होती त्यामुळे त्यात चुकीचे काहीच नव्हते असे स्पष्टीकरण ऍड. आकाश छाजेड यांनी दिले आहे.

काँग्रेस पक्षाच्या संघटनेचा एक व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आले असून त्यात स्व. जयप्रकाश छाजेड उद्यानाचे लोकार्पण दिपाली नगर येथे होणार असल्याचे असल्याची पोस्ट शहराध्यक्ष ऍड. छाजेड यांचे बंधू प्रीतिश छाजेड यांनी टाकली होती मात्र हा काँग्रेसचा ग्रुप आहे की, भाजपाचा हे ठरवून घ्या अशी टिप्पणी दर्शन पाटील यांनी केली.त्यानंतर ऍड. छाजेड यांनी त्यांना समजावण्यासाठी फोन केला होता मात्र त्यांनी फोन उचलला नसल्याने त्यांना थेट पक्षाच्या वॉट्स ग्रुप मधून रिमूव करण्यात आले. दर्शन पाटील हे केवळ सोशल मीडियावरच काम करतात पक्षाच्या बैठकीला देखील उपस्थित नसतात काँग्रेस नेते, माजी आमदार स्वर्गीय जयप्रकाश छाजेड यांच्या नावाने साकारण्यात आलेल्या  उद्यानाच्या लोकार्पणाची ती पोस्ट होती त्यामुळे त्यात वावगे नव्हते असे स्पष्टीकरण आकाश छाजेड यांनी दिले आहे. मात्र, आपण कोणत्या प्रकारे चुकीचा आक्षेप घेतलेला नव्हता. लोकसभा निवडणुकीच्या काळात उमेदवाराच्या प्रचारासाठी अनेक चौकसभा देखील घेतल्या आहेत  अशा प्रकारच्या त्रास देण्यामुळे आपले नीती धैर्य खचणार नाही या संदर्भात आपण प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे तक्रार केली आहे असे प्रवक्ता दर्शन पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकDevyani Farandeदेवयानी फरांदेBJPभाजपाcongressकाँग्रेस