भाजप नेते किरीट सोमय्या नाशकात, भुजबळांच्या मालमत्तेची पाहणी करणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:30 IST2021-09-02T04:30:52+5:302021-09-02T04:30:52+5:30
भुजबळ यांच्यावर यापूर्वीही सोमय्या यांनी गंभीर आरोप केले आहेत, आता भुजबळ यांच्याशी संबंधित शंभर कोटी रुपयांची मालमत्ता आयकर विभागाने ...

भाजप नेते किरीट सोमय्या नाशकात, भुजबळांच्या मालमत्तेची पाहणी करणार?
भुजबळ यांच्यावर यापूर्वीही सोमय्या यांनी गंभीर आरोप केले आहेत, आता भुजबळ यांच्याशी संबंधित शंभर कोटी रुपयांची मालमत्ता आयकर विभागाने जप्त केल्याचा दावा केला आहे. भुजबळ कुटुंबीयांनी त्याचा यापूर्वीच इन्कार केला असला तरी सोमय्या मात्र आरोपांवर ठाम आहेत. नाशिकमधील भुजबळांशी संबंधित आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चरसह अन्य मालमत्तांना भेटी देऊन पाहणी करणार असल्याचे त्यांनी ट्विटर हँडलवर नमूद केले आहे. त्यामुळे सोमय्या विरुद्ध भुजबळ समर्थक असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.
सध्या राज्यात भाजप आणि शिवसेना यांच्यात संघर्ष सुरू आहे. त्यामुळे अलीकडेच परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस देण्यात आल्यानंतर अलीकडेच खासदार भावना गवळी यांच्याशी संबंधित संस्थांवर देखील छापे घातले आहेत. त्यापाठाेपाठ आता भुजबळांकडे सोमय्या यांनी लक्ष वेधले आहेत.
इन्फो...
दरेकरही आज नाशिकमध्ये
नाशिक शहरात भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यापाठोपाठ विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर देखील येणार आहेत. एका खासगी कार्यक्रमासाठी ते येणार असून, दुुपारी दीड वाजता धुळेकडे रवाना होणार आहेत.