'शाई'चा धसका, किरीट सोमया यांच्या कार्यक्रमात व्यासपीठावर 'पेन' नेण्यास मनाई

By संजय पाठक | Updated: December 21, 2022 11:50 IST2022-12-21T11:49:45+5:302022-12-21T11:50:33+5:30

किरीट सोमया यांच्या कार्यक्रमात व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांना पेन नेण्यास मनाई करण्यात आली.

bjp kirit somaiya event banned from carrying ink pen on stage | 'शाई'चा धसका, किरीट सोमया यांच्या कार्यक्रमात व्यासपीठावर 'पेन' नेण्यास मनाई

'शाई'चा धसका, किरीट सोमया यांच्या कार्यक्रमात व्यासपीठावर 'पेन' नेण्यास मनाई

संजय पाठक, नाशिक: राज्याचे उच्च व तंत्रज्ञान मंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाई फेकीचा पोलीस यंत्रणेने धसका घेतला आहे. आज नाशिक मध्ये भाजप नेते किरीट सोमया यांच्या कार्यक्रमात व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांना पेन नेण्यास मनाई करण्यात आली.

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाची सांगता आज होत आहे त्या निमित्ताने आज सकाळी नाशिक शहरातील त्र्यंबकरोडवर संस्थेच्या कार्यालयात किरीट सोमया यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला त्यानंतर व्यासपीठावर सोहळा सुरू झाला मात्र पोलिसांच्या सूचनेनुसार व्यासपीठावर जाणाऱ्या मान्यवरांना पेन आणि मोबाईल नेण्यास मनाई करण्यात आली.

चंद्रकांत पाटील यांच्या वादग्रस्त विधानामुळे त्यांच्यावर शाई फेक करण्यात आली होती. त्याचा धसका घेऊन ही काळजी घेण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: bjp kirit somaiya event banned from carrying ink pen on stage