चारही जागांवर भाजपाचा दावा

By Admin | Updated: August 8, 2014 00:56 IST2014-08-07T01:07:44+5:302014-08-08T00:56:36+5:30

चारही जागांवर भाजपाचा दावा

BJP claims in all four seats | चारही जागांवर भाजपाचा दावा

चारही जागांवर भाजपाचा दावा

 

नाशिक : शिवसेना-भाजपाची युती होणार की नाही याबाबत निर्णय झालेला नसला, तरी नाशिक शहरातील चारही जागा भारतीय जनता पार्टीनेच लढवाव्यात, अशी आग्रही मागणी भाजपाच्या शहर पदाधिकाऱ्यांनी केली. शहराच्या चारही मतदारसंघांतून किमान दोन डझन उमेदवारांनी इच्छुक म्हणून मुलाखती दिल्या.
भाजपाच्या शहर पदाधिकाऱ्यांची बैठक निरीक्षक आमदार चंद्रकांत पाटील व आमदार माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत शुभमंगल कार्यालयात झाली. यावेळी शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, प्रदेश सरचिटणीस सीमा हिरे, सुहास फरांदे, माजी शहराध्यक्ष विजय साने, भाजयुमोर्चा शहराध्यक्ष गिरीश पालवे, उपमहापौर सतीश कुलकर्णी, आमदार अपूर्व हिरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी शहरातील पदाधिकाऱ्यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात जास्त मतदारसंघ मिळण्याची आशा कमी असल्याने नाशिक लोकसभा मतदारसंघात इगतपुरी व सिन्नर विधानसभा मतदारसंघात फारशी संधी नसल्याने शहरातील पूर्व, मध्य, पश्चिम व देवळाली हे चारही विधानसभा मतदारसंघ भाजपानेच लढवावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. पूर्वसाठी सहा, पश्चिमसाठी आठ, मध्यसाठी तीन, तर देवळालीसाठी पाच अशा संख्येने इच्छुकांनी मुलाखती दिल्या. यावेळी माजी महापौर बाळासाहेब सानप, प्रा. देवयानी फरांदे, कमलेश बोडके, दामोदर मानकर, जगन पाटील, सुरेश पाटील, सुनील केदार, कुणाल वाघ, कुणाल गायकवाड, प्रशांत भदाणे, प्रशांत जाधव, अजित ताडगे, नाना शिलेदार, सुजाता करजगीकर, भारती बागुल, गणेश कांबळे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: BJP claims in all four seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.