शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

भाजप, सेना ताट-वाट्या घेऊन राज्यभर फिरताहेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 02:04 IST

महाराष्टÑातील बंद पडलेले उद्योग, तरुणांची बेरोजगारी व शेतकऱ्यांच्या वाढत चाललेल्या आत्महत्या या प्रश्नांवर न बोलणारी भारतीय जनता पार्टी व शिवसेना विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राज्यात ताट-वाट्या घेऊन फिरत असल्याची टीका करून, महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी, एक पक्ष दहा रुपयांत तर दुसरा पाच रुपयांत थाळी देण्याचे आश्वासन देत असल्याचे पाहून महाराष्टÑ भिकेला लागलाय काय? असा सवालही उपस्थित केला.

ठळक मुद्देराज ठाकरे यांची घणाघाती टीका : शिवसेना सत्तेसाठी घरंगळली

नाशिक : महाराष्टÑातील बंद पडलेले उद्योग, तरुणांची बेरोजगारी व शेतकऱ्यांच्या वाढत चाललेल्या आत्महत्या या प्रश्नांवर न बोलणारी भारतीय जनता पार्टी व शिवसेना विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राज्यात ताट-वाट्या घेऊन फिरत असल्याची टीका करून, महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी, एक पक्ष दहा रुपयांत तर दुसरा पाच रुपयांत थाळी देण्याचे आश्वासन देत असल्याचे पाहून महाराष्टÑ भिकेला लागलाय काय? असा सवालही उपस्थित केला.महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ येथील डोंगरे वसतिगृह मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. आपल्या भाषणात शिवसेनेवर तुटून पडताना राज ठाकरे यांनी भाजपाने जागावाटपात नाशिक व पुण्यात शिवसेनेला एकही जागा न सोडल्याचा संदर्भ दिला तसेच उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची आठवण करून देताना ते म्हणाले, यापुढे महाराष्टÑावर एक हाती भगवा फडकावयाचा असून, गेली २५ वर्षे भाजपाबरोबर युती करून सडली, असे म्हणणाºया उद्धव ठाकरेंना नाशिक व पुण्यात विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी भाजपाने एकही जागा न सोडल्याने शिवसेनेच्या लोकांनी काय करायचे? असा प्रश्नही राज ठाकरे यांनी केला.सत्तेसाठी शिवसेना भाजपाच्या पाठीमागे घरंगळत चालली असून, ही माणसे आहेत की गोट्या असा प्रश्नही राज ठाकरे यांनी केला.पंतप्रधानांनी नोटबंदी केल्यानंतर आपण हा निर्णय जर चुकला तर देश खड्ड्यात जाईल, असे भाकीत केले होते, तसेच घडले असून, नोटबंदीनंतर रांगेत उभे राहून अनेकांना प्राण गमवावा लागला, देशाची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खालवत चालली.नाशिकचा पराभव जिव्हारी लागला...नाशिक महापालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामे केली. मात्र तरीही निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. कधी कधी काय पाहिजे हेच कळत नाही. काम करून सत्ता मिळत नाही आणि जे काहीच करत नाही त्यांना मात्र भरभरून दिले जाते. त्यामुळे नाशिकचा पराभव जिव्हारी लागला, असे राज ठाकरे यांनी सांगतानाच आपली खंत जाहीर सभेत केली.च्नाशिककरांवर बोजा नको म्हणून बाहेरून निधी आणला आणि कामे केली. टाटा किंवा अन्य कोणी अन्य शहरात जाऊन कामे केली आहेत का, असा प्रश्न करीत त्यांनी तरीही आपले नाशिकवरचे प्रेम कमी झाले नाही, असे नमूद केले. नाशिक महापालिकेत आपण कामे केली, इतकी कामे गेल्या तीस वर्षांत झाली नाही, मात्र आता काय सुरू आहे. महापालिका ओरबाडण्याचे काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.किती काश्मिरी पंडित परतले?निवडणुकीच्या प्रचारात पाच वर्षे सत्तेत असताना त्यांनी काय कामे केली, हे सांगत नाही. जनतेचे भलत्याच प्रश्नाकडे लक्ष वळविले जात असून, काश्मीरमधील ३७० कलम रद्द करण्याचा व महाराष्टÑाच्या निवडणूक प्रचाराशी त्याचा काय संबंध? हा प्रश्न काश्मीरपुरता मर्यादित असून, ३७० रद्द केल्यानंतर सरकारने काश्मीरमध्ये काय केले? किती काश्मिरी पंडित पुन्हा काश्मीरमध्ये परत आले याचा आकडा भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी जाहीर करावा, असे आव्हानही ठाकरे यांनी दिले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा