चांदवडच्या समस्यांबाबत भाजप आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:15 IST2021-09-21T04:15:42+5:302021-09-21T04:15:42+5:30
यावेळी अंकुर कासलीवाल, सुशील पलोड, कासीफ खान, बाळा पाडवी, योगेश बोरसे, सुनील डुंगरवाल, मुन्ना गांधी, सचिन राऊत, प्रशांत वैद्य, ...

चांदवडच्या समस्यांबाबत भाजप आक्रमक
यावेळी अंकुर कासलीवाल, सुशील पलोड, कासीफ खान, बाळा पाडवी, योगेश बोरसे, सुनील डुंगरवाल, मुन्ना गांधी, सचिन राऊत, प्रशांत वैद्य, महेंद्र कर्डिले, किशोर क्षत्रिय, सचिन राऊत, नीलेश काळे, संजय क्षत्रिय, राजाभाऊ आहिरे, मनोज बांगरे, बाळासाहेब वाघ, देवा पाटील, शिवाजी गवळी, गणेश पारवे, राजाभाऊ अहिरे, वर्धमान पांडे, हिरामण शेळके आदी उपस्थित होते. चांदवड शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्यांवर पाणी साचत असून वाहतुकीला अडचण निर्माण होत आहे. रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, मुरूम टाकून खड्डे बुजविण्यात यावे, त्याचप्रमाणे मंजूर असलेले व निविदाप्रक्रिया पूर्ण झालेल्या रस्त्यांच्या कामांना तत्काळ सुरुवात करण्यात यावी. शहरामध्ये गटारीची कामे अपूर्ण असून, गटारींची स्वच्छतादेखील करण्यात येत नसल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. शहरामध्ये स्वच्छतेच्या बाबतीतदेखील मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत असून, अस्वच्छतेचे प्रमाण वाढले आहे. शहरामध्ये अतिक्रमणाचा महत्त्वाचा प्रश्न असून स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन कार्यवाही करावी. शहरात बांधकाम परवानगीबाबत अनेक संभ्रम असून, बांधकाम परवानगीच्या फाईल अनेक दिवस कार्यवाही न होता प्रलंबित राहतात, त्यांची सोडवणूक व्हावी. शहरात अनेक ठिकाणी मोकाट जनावरे फिरत असून त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
इन्फो
अशुद्ध पाणीपुरवठा
वरच्या गावात खोकड तलावातून अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने आजाराचे प्रमाण वाढले आहे. शहरातील अनेक पथदीप बंद अवस्थेत आहेत. अनेक ठिकाणी विद्युततारा लोंबकळत असून, विद्युतखांबही जीर्ण अवस्थेत झालेले आहे. नगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होण्याआधी प्रभागरचना यादीनुसार तसेच प्रगणक गटानुसार वाॅर्डनिहाय नकाशे करावे. यावर कारवाई न झाल्यास येत्या ३ ऑक्टोबर रोजी चांदवड नगर परिषद येथे शहर भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असेही यावेळी सांगण्यात आले.
फोटो- २० चांदवड निवेदन
चांदवड शहरातील विविध समस्यांचे निवेदन मुख्याधिकारी अभिजित कदम यांना देताना आमदार डॉ. राहुल आहेर. समवेत भूषण कासलीवाल, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते.
200921\20nsk_30_20092021_13.jpg
फोटो- २० चांदवड निवेदन चांदवड शहरातील विविध समस्यांचे निवेदन मुख्याधिकारी अभिजित कदम यांना देतांना आमदार डॉ.राहुल आहेर. समवेत भूषण कासलीवाल यांचेसह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते.