कडवा पाणी योजना चाचणीसाठी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 00:47 IST2020-01-30T23:10:46+5:302020-01-31T00:47:36+5:30

कडवा पाणी योजनेत महत्त्वाची असलेली जलदाब (हायड्रोलिक) चाचणी आठ दिवसांपासून सुरू आहे. पंधरा दिवसांत गळती दुरुस्तीसाठी चाचणीचे काम पूर्ण होणार आहे. चाचणीसाठी १५ दिवसांपासून कडवा पाणी योजना बंद करण्यात आली असून, नगर परिषदेच्या जुन्या योजनेद्वारे शहराला पाणीपुरवठा सुरू आहे.

Bitter water plan closed for testing | कडवा पाणी योजना चाचणीसाठी बंद

सिन्नर नगर परिषदेचे नगराध्यक्ष किरण डगळे, पाणीपुरवठा सभापती शैलेश नाईक व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कडवा पाणी योजनेची सुरू असलेली जलदाब चाचणी.

ठळक मुद्देसिन्नर : गळती दुरुस्तीसाठी काम सुरू; जुन्या योजनेतून होणार पाणीपुरवठा

सिन्नर : कडवा पाणी योजनेत महत्त्वाची असलेली जलदाब (हायड्रोलिक) चाचणी आठ दिवसांपासून सुरू आहे. पंधरा दिवसांत गळती दुरुस्तीसाठी चाचणीचे काम पूर्ण होणार आहे. चाचणीसाठी १५ दिवसांपासून कडवा पाणी योजना बंद करण्यात आली असून, नगर परिषदेच्या जुन्या योजनेद्वारे शहराला पाणीपुरवठा सुरू आहे.
नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष गोविंद लोखंडे, गटनेते हेमंत वाजे, पाणीपुरवठा सभापती शैलेश नाईक, श्रीकांत जाधव, डी. आर. कन्सल्टंटचे योजना अभियंता टी. बी. बकाल, कुलदीप मडगे, सुशील दोरखंडे आदींच्या उपस्थितीत रोज चाचणीचे काम सुरू आहे. जलवाहिन्यांत गळती राहू नये यासाठी जलदाब चाचणी हाती घेण्यात आली आहे. जलदाब चाचणीत कमाल ३२ केजीपर्यंत दाब देण्यात येतो. कडवा पाणी योजनेसाठी ३५ केजीपर्यंतचा दाब दिला जात आहे. जवळचे दोन व्हॉल्व्ह बंद करून एअर व्हॉल्व्हद्वारे हायड्रोलिक पंपाने पाण्याचा दाब दिला जातो.
जलदाब चाचणीसाठी कडवा पाणी योजना पंधरा दिवसांपासून बंद आहे. चेहडी येथील बंधाºयातून जुन्या योजनेद्वारे शहराला पाणीपुरवठा केला जात आहे. पंधरा दिवसांत योजनेची चाचणी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा
कडवा योजनेतून पाणीपुरवठा सुरू होणार असून, तोपर्यंत नागरिकांनी पाणी जपून वापरावे व नगर परिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा सभापती नाईक यांनी केले आहे.

Web Title: Bitter water plan closed for testing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.