हरेकृष्ण बाबांचा जन्मशताब्दी सोहळा: हेलिकॉप्टरने पालखीवर पुष्पवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:19 IST2018-03-17T00:18:50+5:302018-03-17T00:19:39+5:30
तालुक्यातील देवरगाव येथे गुरुवारी (दि. १५) हरेकृष्ण बाबांचा जन्मशताब्दी सोहळा उत्साहात पार पडला. यानिमित्त गावातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी राज्यभरातून भाविक उपस्थित होते.

हरेकृष्ण बाबांचा जन्मशताब्दी सोहळा: हेलिकॉप्टरने पालखीवर पुष्पवृष्टी
चांदवड : तालुक्यातील देवरगाव येथे गुरुवारी (दि. १५) हरेकृष्ण बाबांचा जन्मशताब्दी सोहळा उत्साहात पार पडला. यानिमित्त गावातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी राज्यभरातून भाविक उपस्थित होते.
येथील वै.ह.भ.प. गुरुवर्य योगीराज हरेकृष्ण बाबा यांच्या या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त बुधवार (दि. ७) ते शुक्रवार (दि. १६) या काला-वधीत शताब्दी सोहळा व श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन ह.भ.प. सुजित महाराज यांनी केले होते. येथे श्री हरेकृष्ण बाबा यांच्या समाधिस्थळी जन्मशताब्दी सोहळ्याचे आयोजन त्यांचे शिष्य सुजित महाराज यांनी केले होते. यानिमित्त आठ दिवस विविध महंतांची कीर्तने व प्रवचनेही झालीत. सोहळ्यात रवींद्र महाराज राजपूत (वरसोडकर), सुुुकदेव महाराज राजपूत (कन्हैया), संदीपन महाराज (असेगाव, पेण), पांडुरंग महाराज घुले (देहू संस्थान), बंडा तात्या कराडकर (सातारा), मुरलीधर महाराज धूत (पंढरपूर), जयंत महाराज बोधले (पंढरपूर) यांची कीर्तने झाली. यावेळी चांदवडचे नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, पंचायत समिती सभापती डॉ. नितीन गांगुर्डे, नितीन अहेर, जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव, अशोक भोसले, विलास ढोमसे आदींसह चांदवड तालुक्यातील नव्हे तर महाराष्टÑातील हरेकृष्ण बाबांचे भक्त उपस्थित होेते.
पालखी सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी श्रीकांत भारतीय, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार डॉ. राहुल अहेर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते समाधीचे व पालखीचे पूजन करण्यात आले.