शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

बर्ड फेस्टिव्हल : नांदूरमधमेश्वरमध्ये पक्षीप्रेमींची मांदियाळी; रविवारी समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 21:30 IST

दरवर्षी हिवाळ्यात या अभयारण्यात विविध स्थलांतरित पक्ष्यांचे संमेलन भरलेले पहावयास मिळते. सध्या या जलाशयाच्या परिसरातील बदकांच्या विविध प्रकारांसह बगळ्यांच्या विविध जाती व करकोच्यांचे थवे विहार करताना नजरेस पडत आहेत.

नाशिक : नांदूरमधमेश्वर धरणाच्या पाणथळ जागेवर विकसित करण्यात आलेले पक्षी अभयारण्य विविध स्थलांतरित देशी-विदेशी पक्ष्यांचे नंदनवन म्हणून ओळखले जाते, मात्र हे अभयारण्य लोकप्रियतेपासून काहिसे वंचित राहिले होते. यावर्षी प्रथमच वन्यजीव विभागाने पुढाकार घेत ‘बर्ड फेस्टिव्हल’भरविल्याने पक्षीप्रेमींची जत्रा भरली आहे.निफाड तालुक्यातील चापडगाव येथील निसर्ग संकु ल केंद्र अर्थात पक्षी अभयारण्याच्या मुख्य पक्षी निरीक्षण केंद्राच्या आवारात तीनदिवसीय महोत्सवाला मागील शुक्रवार (दि.१९) पासून प्रारंभ झाला आहे. या पक्षी महोत्सवांतर्गत विविध वन्यजीव छायाचित्रकार, अभ्यासक, पयार्वरण तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर चर्चासत्रांच्या माध्यमातून दुपारच्या सत्रात पर्यावरणविषयक व जैवविविधतेमधील अन्नसाखळीच्या महत्त्वाविषयी मंथन घडून येत आहे.

या चर्चासत्रांसाठी चापडगाव परिसरातील एकूण अकरा गावांमधील प्राथमिक शाळांसह माध्यमिक शाळांचे विद्यार्थी व शहरातील सिडको, इंदिरानगर, सातपूर, गंगापूररोड आदी परिसरातील शाळांच्या विद्यार्थ्यांची सतत वर्दळ आहे. दोन दिवसांमध्ये सुमारे एक हजाराहून अधिक शालेय विद्यार्थ्यांनी भेटी दिल्याचा दावा वन-वन्यजीव विभागाने केला आहे. वन्यजीव छायाचित्रकार अतुल धामणकर, राजू कसांबे, नंदकिशोर दुधे, विभास अमोनकर, डॉ. डेर्ले, दत्ता उगावकर, अभय केवट, डॉ. प्राची मेहता आदींनी मार्गदर्शन केले. विविध शाळांचे विद्यार्थी चर्चासत्राला उपस्थित राहिल्याने भावी पिढीमध्ये निसर्गाविषयी नक्कीच जागृती होण्यास मदत होणार आहे.

दरवर्षी हिवाळ्यात या अभयारण्यात विविध स्थलांतरित पक्ष्यांचे संमेलन भरलेले पहावयास मिळते. सध्या या जलाशयाच्या परिसरातील बदकांच्या विविध प्रकारांसह बगळ्यांच्या विविध जाती व करकोच्यांचे थवे विहार करताना नजरेस पडत आहेत. गढवाल, शॉवलर, स्पूनबिल, पेंटेड स्टॉर्क , तलवार, जांभळी पाणकोंबडी, डोमिसील क्रेन, जांभळ बगळा, लालसरी आदी पक्ष्यांनी अभयारण्य गजबजले आहे. नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्यामध्ये सुरू असलेले पक्षी संमेलन अंतिम टप्प्यात आले असून, थंडीचा जोर जसा ओसरू लागेल तसे परदेशी पाहुणे येथून मायदेशी परतण्यास सुरुवात होणार असल्याचे पक्षीप्रेमी सांगतात. महोत्सवादरम्यान घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. पारितोषिक वितरण सोहळ्याला प्रमुख पाहूणे म्हणून वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील उपस्थित राहणार आहे. 

टॅग्स :nandurmadhmwshwerनांदूरमधमेश्वरNashikनाशिकforest departmentवनविभागbirds sanctuaryपक्षी अभयारण्य