शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

जैव-वैद्यक कचरा व्यवस्थापन प्र्रणाली प्रक्रिया आधारित असावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 00:27 IST

जैव-वैद्यकीय कचरा पर्यावरणास हानिकारक ठरत असताना अशा कचºयाचे योग्य नियोजन, व्यवस्थापन व निर्मूलन झाले नाही तर त्यापासून संसर्गजन्य रोगांचा प्रसारही होण्याची भीती असल्याने सर्व वैद्यकीय सेवा संस्थांनी अशा जैव-वैद्यकीय कचºयाचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. त्यासाठी जैव-वैद्यक कचºयाचे दुष्परिणाम लक्षात घेऊन या कचºयाची व्यवस्थापनप्रणाली ही व्यक्तीवर नव्हे तर प्रक्रियेवर आधारित असावी, असे प्रतिपादन आमदार देवयानी फरांदे यांनी केले.

नाशिक : जैव-वैद्यकीय कचरा पर्यावरणास हानिकारक ठरत असताना अशा कचºयाचे योग्य नियोजन, व्यवस्थापन व निर्मूलन झाले नाही तर त्यापासून संसर्गजन्य रोगांचा प्रसारही होण्याची भीती असल्याने सर्व वैद्यकीय सेवा संस्थांनी अशा जैव-वैद्यकीय कचºयाचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. त्यासाठी जैव-वैद्यक कचºयाचे दुष्परिणाम लक्षात घेऊन या कचºयाची व्यवस्थापनप्रणाली ही व्यक्तीवर नव्हे तर प्रक्रियेवर आधारित असावी, असे प्रतिपादन आमदार देवयानी फरांदे यांनी केले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ ग्लोबल इनव्हायरमेंट फॅसिलिटी (जीईए), युनायटेड नेशन इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट आॅर्गनायझेशन (युनिडो) व केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरणीय बदल मंत्रालय यांच्या संयुक्त ‘जैव-वैद्यकीय कचºयाचे पर्यावरणदृष्ट्या सुयोग्य व्यवस्थापन’ प्र्रकल्पांतर्गत नाशिक जिल्ह्यातून सुरू करण्यात आलेल्या पथदर्शी अभियानाचे शहरातील एका तारांकित हॉटेलमध्ये देवयानी फरांदे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. ८) उद्घाटन झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.  व्यासपीठावर विएन्ना येथील युनिडोच्या मुख्यालयातील प्रकल्प व्यवस्थापक एर्लिंडा गलवेन, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचे संचालक मनोजकुमार गांगेया, राज्य पर्यावरण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सतीश गवळी, जीईए व युनिडोचे प्रादेशिक समन्वयक डॉ. शक्तिप्रसाद धुआ, आमदार सीमा हिरे, महापौर रंजना भानसी आदी उपस्थित होते.  यावेळी बोलताना फरांदे यांनी जैव-वैद्यकीय कचरा व्यवस्थापन कायदा हा नागरिकांच्या सुरक्षेसाठी असून, यातील डॉक्टर महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी करताना एमपीसीबीच्या अधिकाºयांनी डॉक्टरांना त्याचा त्रास होणार नाही याची काळजी घेण्याची गरज असल्याचेही सांगितले. तसेच रुग्णालय व्यवस्थापनात औषधनिर्माण शास्त्रातील विद्यार्थ्यांना सामावून घेण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रधान वैज्ञानिक अधिकारी डॉ. अमर सुपाते व सतीश गवळी यांच्या हस्ते जैव-वैद्यकीय कचरा व्यवस्थापन व निर्मूलनासंबंधी जनजागृती करणाºया मोबाइल अ‍ॅपचे उद्घाटन करण्यात आले.  या अभियानाची जनजागृती करणाºया माहितीपटाचेही यावेळी अनावरण करण्यात आले. दरम्यान, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक सुरेश जगदाळे यांना जैव-वैद्यक कचºयाच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक कचराकुंड्या प्रातिनिधिक स्वरूपात भेट देण्यात आल्या. डॉ. शक्तिप्रसाद धुआ यांनी प्रास्ताविक केले. आर. यू. पाटील यांनी आभार मानले.महापालिका घरगुती कचºयाचे घंटागाडीच्या माध्यमातून संकलन करून कचºयाचे पर्यावरणपूरक दृष्टीने व्यवस्थापन व निर्मूलन करते. त्याचप्रमाणे जैव-वैद्यक कचºयाच्या व्यवस्थापनासाठी सर्व वैद्यकीय रुग्णालये, मेडिकल्स, डॉक्टर्स, परिचारिका, विद्यार्थी यांनी अधिक जबाबदारीने कचºयाचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.- रंजना भानसी, महापौर, नाशिक जैव-वैद्यकीय कचºयापासून होणारे रोगांचे संसर्ग तसेच विषारी वायूंच्या निर्मितीसारखे दुष्परिणाम रोखण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने कचºयाचे निर्मूलन करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पाऊल महत्त्वपूर्ण आहे.  - सीमा हिरे, आमदार, नाशिक

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMLAआमदार