शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
2
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
3
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
4
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
5
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
6
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
7
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
9
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
10
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
11
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
12
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
13
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
14
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
15
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
16
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
17
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
18
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
19
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
20
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   

कोट्यवधींची फसवणूक : विष्णू भागवतला अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 15:26 IST

काही दिवसांपुर्वीच ४ कोटी ८ लाख ६ हजार ६०९ रूपयांच्या १२ महागड्या कार राज्यातील मोठ्या शहरांमधून पोलिसांनी जप्त केल्या होत्या. तत्पुर्वी १५ जानेवारी २०२० रोजी आर्थिक गुन्हे शाखेने भागवतच्या दोन्ही कंपन्यांच्या संपत्तीवर टाच आणून त्याची २७ बॅँक खाती गोठविली.

ठळक मुद्देत्याची २७ बॅँक खाती गोठविली.४ कोटी ८ लाखच्या १२ महागड्या कार जप्त राज्याबाहेरदेखील यांचा फसवणूकीचा प्रताप

नाशिक : गुंतवणूकीवर वेगवेगळ्या योजनांद्वारे जादा मोबदल्याचे आमीष दाखवून नाशिक शहरासह राज्यातील विविध मोठ्या शहरांमध्ये कोट्यवधी रूपयांची हजारो ठेवीदारांची मागील दोन वर्षांपासून फसवणूक करणारा माऊली, उज्वलम सोसायटी तसेच संकल्पसिध्दी प्रॉडक्ट इंडियाचा संचालक संशयित आरोपी विष्णू रामचंद्र भागवत यास नाशिक पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या. त्यास जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने गुरूवारपर्यंत (दि.१३) पोलीस कोठडी सुनावली.शहरातील यापुर्वी मुंबईनाका पोलीस ठाण्यात भागवतविरूध्द गुन्हा दाखल होता. तसेत शनिवारी (दि.८) त्याच्यासह साथीदारांविरूध्द पुन्हा अंबड पोलीस ठाण्यात २ लाख १० हजारांची फसवणूक केल्याचा गुन्हा एका फिर्यादीवरून दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकामार्फत सुरू केला. भागतवने स्थापन केलेल्या माऊली, संकल्पसिध्दी, उज्वलमसारख्या कंपन्यांच्या सात दलालांच्या सर्वप्रथम मुसक्या बांधल्या. त्यांनी ठेवीदारांच्या रकमेतून भागवतमार्फत कर्ज घेत महागड्या कारची खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. दलालांना गजाआड केल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अंबडमधील एका सोसायटीतून त्यांचा म्होरक्या संशयित भागवतलाही बेड्या ठोकल्या. त्यास न्यायालयाने गुरूवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. भागवतविरूध्द हिमाचलप्रदेशच्या चंबा पोलीस ठाण्यासह पुणे ग्रामीण पोलीसांच्या हद्दीतील आळेफाटा, नाशिकच्या जायखेडा, भांडुप, जळगाव, धुळे, नंदूरबार, अहमदनगर, पिंपरी-चिंचवड या शहरांमध्येही गुन्हे दाखल आहेत. या सर्व पोलीस ठाण्यांना भागवत फसवणूकीच्या गुन्ह्यांत हवा होता. नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने त्याच्याविरूध्द सुरूवातीपासूनच फास आवळला. काही दिवसांपुर्वीच ४ कोटी ८ लाख ६ हजार ६०९ रूपयांच्या १२ महागड्या कार राज्यातील मोठ्या शहरांमधून पोलिसांनी जप्त केल्या होत्या. तत्पुर्वी १५ जानेवारी २०२० रोजी आर्थिक गुन्हे शाखेने भागवतच्या दोन्ही कंपन्यांच्या संपत्तीवर टाच आणून त्याची २७ बॅँक खाती गोठविली....अशा केल्या होत्या कंपन्या स्थापनउज्वलम अ‍ॅग्रो, माऊली मल्टिस्टेट सोसा., ग्लोबल चेक इन्स्, ग्लोबल सिटीझन, नारायणगिरी महाराज फाउण्डेशन, संकल्पसिध्दी प्रॉडक्ट इंडिया, लिनी इंडस्ट्रिज, यांसारख्या कंपन्या, सोसायट्या, फ र्मची स्थापना करून भागवत व त्याच्या साथीदारांनी संगनमताने विविध योजना काढून गुंतवणूकदारांना जादा मोबदल्याचे (कमिशन) आमीष दाखवून लाखो रूपये उकळले. नाशिकमध्येच नव्हे तर संपुर्ण राज्यात व राज्याबाहेरदेखील यांचा फसवणूकीचा प्रताप पोहचल्याचे तपासात पुढे आले आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयArrestअटकCrime Newsगुन्हेगारी