शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात दागिने चोरीचे सत्र सुरुच ;दुचाकीचालक महिलेची सोनसाखळी खेचली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 16:30 IST

नाशकात सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना पाथर्डी फाटा परिसरातील माऊलीनगर  रस्त्यावरून दुचाकीवरून जात असलेल्या  महिलेच्या गळ्यातील पाच तोळे वजनाची व सुमारे एक लाख रुपये किमतीची सोन्याची पोत खेचून नेल्याची घटना घडली आहे. 

ठळक मुद्देमहिलेच्या गळ्यातील पाच तोळयाची सोन्याची पोत खेचलीपोत खेचून चोरटे काळ्या रंगाच्या दुचाकीवरून फरार

नाशिक : परिसरात सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना पाथर्डी फाटा परिसरातील माऊलीनगर  रस्त्यावरून दुचाकीवरून जात असलेल्या  महिलेच्या गळ्यातील पाच तोळे वजनाची व सुमारे एक लाख रुपये किमतीची सोन्याची पोत खेचून नेल्याची घटना घडली आहे. सिडकोतील बडदेनगर येथील रविवासी अंजली परमेश्वर पाटील (५०)  गुरुवारी (दि.३०)  रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास वासननगर येथे कल्पतरु बंगल्या जवळ पाठीमागुन आलेल्या काळया रंगाची पल्सर तिचेवरील हेल्मेट व काळे रंगाचे जाकेट घातलेला , उंच व  शरीराने सडपातळ अंदाजे ३० वर्षे वयाच्या चालक तरुणासह मागे तब्येतीने मजबूत काळे रंगाचे जाकेट घालून घातलेला २५ वर्षे वयाचा तरुणांनी अंजली पाटील मोपेड दुचाकी क्रमांक एमएच १५  ईक्यु  ८८९९ वरून मुलाच्या लग्नाची पत्रीका देण्यासाठी जात असताना त्यांच्या गळयातील सोन्याची पोत चोरट्यांनी खेचू नेली. या घटनेनंर अंजली पाटील व त्यांच्या चुलत ननंद  मंजु रामसिंग पाटील आरडा ओरडा करून चोरट्यांचा पाठलागही केला. परंतु चोरटे भरधाव वेगात निघुन गेले. त्यामुळे अंजली पाटील यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, इंदिरानगर परिसरातील पादचारी महिलांचे सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असताना आता दुचाकीवरून  जाणाऱ्या महिलांनाही सोनसाखळी चोरांनी लक्ष केल्याने दुचाकी चालक महिलांचा अपघात होऊन त्यांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे परिसरातील  वाढत्या गुन्हेगारीमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिसThiefचोर