सिन्नर येथे दुचाकीची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:11 IST2021-06-26T04:11:43+5:302021-06-26T04:11:43+5:30
------------------------------- बेवारस दुचाकी घेऊन जाण्याचे आवाहन सिन्नर : तालुक्यातील वावी पोलीस ठाण्याच्या आवारात गेल्या अनेक दिवसांपासून १४ अपघातग्रस्त व ...

सिन्नर येथे दुचाकीची चोरी
-------------------------------
बेवारस दुचाकी घेऊन जाण्याचे आवाहन
सिन्नर : तालुक्यातील वावी पोलीस ठाण्याच्या आवारात गेल्या अनेक दिवसांपासून १४ अपघातग्रस्त व बेवारस दुचाकी पडून आहेत. सदर दुचाकींच्या मालकांनी गाडीची कागदपत्रे दाखवून ही वाहने घेऊन जाण्याचे आवाहन वावी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते यांनी केले आहे. अन्यथा, सदर वाहनांचा लिलाव करण्यात येईल, अशी माहितीही कोते यांनी दिली.
---------------------------
डुबेरेत डासांचा प्रादुर्भाव वाढला
सिन्नर : परिसरात रिमझिम पावसामुळे डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती वाढली आहे. सकाळ, संध्याकाळ डासांच्या झुंडी फिरत असल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. डासांच्या बंदोबस्तासाठी ग्रामपंचायतीने धूरफवारणी केली, मात्र त्याचा उपयोग झाला नाही. आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने अनेकांना दवाखान्यात दाखल व्हावे लागत आहे. रिमझिम पावसामुळे गाव परिसरात छोटे-छोटे गवत उगवल्याने डासांना लपण्यासाठी जागा तयार झाली आहे. डासांच्या उत्पत्तीचा नाश करण्यासाठी, प्रादुर्भाव रोखण्यासाठी धुराळणीसोबतच तणनाशक औषधांची फवारणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
---------------------------------
आरक्षणासाठी छत्रपतींना चाबूक भेट
सिन्नर : राज्य सरकार, केंद्रीय सरकार, आमदार यांना मराठा आरक्षण देण्यास कार्यरत करण्यासाठी नाशिक येथे आंदोलनासाठी आलेल्या खासदार संभाजीराजे यांना सिन्नरचे शरद शिंदे यांच्यासह मराठा बांधव व शेतकऱ्यांनी चाबूक भेट दिला. यावेळी शिवाजी गुंजाळ, सुनील महाराज, अर्जुन घोरपडे, नितीन वाजे, खुळे, काटे, कदम, गुरुळे, पवार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.