नाशिक : शहरात दुचाकीचोरीचे सत्र सुरूच असून, शहरातील मुंबई नाका परिसरातून एक तर गंगापूर परिसरातून दोन दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना शनिवारी (दि.२३) समोर आल्या आहेत. शहरात दिवसेंदिवस मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना अपयश आल्याने दुचाकी चोर मोकाट सुटले आहेत. मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत तिडके कॉलनीतील मानस हॉस्पिटलसमोरून काळ्या रंगाची दुचाकी (एमएच १५, डीबी ५९०१) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी त्र्यंबक रामदास गांगुर्डे (३५) यांनी फिर्याद दिली असून, मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी घटनेत सिटीसेंटर मॉलच्या मागील बाजूस मटेरियल गेटजवळ उभी केलेली लाल रंगाची दुचाकी (एमएच१५ एफए ) चोरीला गेली आहे. शिवाजीनगर, ध्रुवनगर भागातील समाधान हिरामण मोरे (३०) यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसरी घटनाही गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतच घडली आहे. निमानी बस स्थानक परिसरातील स्वप्निल प्रकाश गायकवाड (३१) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांची १५ हजार रुपये किमतीची निळ्या रंगाची दुचाकी (एमएच१५ सीडब्लू ३४६८) गंगापूर रोड परिसरातील सहदेवनगर दत्त चौकातून चोरीला गेली आहे.
शहरात दुचाकीचोरीचे सत्र सुरूच; चोरटे मोकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 01:23 IST
शहरात दुचाकीचोरीचे सत्र सुरूच असून, शहरातील मुंबई नाका परिसरातून एक तर गंगापूर परिसरातून दोन दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना शनिवारी (दि.२३) समोर आल्या आहेत.
शहरात दुचाकीचोरीचे सत्र सुरूच; चोरटे मोकाट
ठळक मुद्देमुंबई नाका, गंगापूर भागातून वाहनांची चोरी