मालेगावातून दुचाकी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:15 IST2021-09-26T04:15:25+5:302021-09-26T04:15:25+5:30
-------------------------- गहाण ठेवलेल्या जमिनीची परस्पर विक्री मालेगाव : येथील सटाणा नाकावरील श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनीकडे कर्ज करारानुसार गहाण ठेवलेल्या ...

मालेगावातून दुचाकी चोरी
--------------------------
गहाण ठेवलेल्या जमिनीची परस्पर विक्री
मालेगाव : येथील सटाणा नाकावरील श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनीकडे कर्ज करारानुसार गहाण ठेवलेल्या शेतजमिनीची परस्पर विक्री करून करारनाम्याचा भंग व फसवणूक केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शाखेचे व्यवस्थापक पंकज दत्तात्रय पवार यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनीकडून योगेश चिंधा डिंगर, ठगाबाई चिंधा डिंगर, प्रशांत धर्मराज सोनार, मनोज मोतीराम सुमराव यांनी ४ लाख २५ हजार रुपये व्यवसाय कर्ज घेतले होते. या कर्जाच्या सुरक्षिततेसाठी शेतजमीन गट क्रमांक ३०८/३/अ एकूण ९२ आर पैकी ३९ आरचे गहाणखत केले होते. संबंधितांनी करारनाम्याचा भंग करून जमिनीची परस्पर विक्री व खरेदी करून फायनान्स कंपनीची ६ लाख २ हजार २१६ रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.
-----------------------------------
फसवणूक करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा
मालेगाव : येथील श्रीराम सिटी युनियन फायनान्स कंपनीकडे कर्ज करारानुसार १८ लाख रुपये रकमेचा व्यवसाय कर्ज मंजूर करून कर्जाच्या सुरक्षिततेसाठी संगमेश्वर शिवारातील प्लॉटची परस्पर विक्री करून कंपनीची फसवणूक करणाऱ्या तिघांविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नीलेश मदन पाटील यांनी फिर्याद दिली आहे. बस्तीमल भोजराज श्रीमाळ, मच्छिंद्र चैत्राम गायकवाड, भागचंद रघुनाथ जगताप यांनी प्लॉटची परस्पर विक्री करून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील हे करीत आहेत.
-------------------------
दुचाकीची समोरासमोर धडक; एक जखमी
मालेगाव : जुना मुंबई - आग्रा महामार्गावर फारान हॉस्पिटलसमोर अज्ञात दुचाकी चालकाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात अशोक धुडकू सूर्यवंशी हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी कमलेश विनोद संचलेचा यांनी पवारवाडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. दुचाकी क्रमांक एमएच ४१ बीडी ३१३५ हिच्यावरून अशोक सूर्यवंशी जात असताना अज्ञात दुचाकी चालकाने धडक दिली. या धडकेत जखमी झाले. याप्रकरणी पुढील तपास हवालदार बाविस्कर करीत आहेत.
----------------------------
अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्याविरुद्ध गुन्हा
मालेगाव : तालुक्यातील वडनेर येथील अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या अज्ञात इसमाविरुद्ध वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या १७ वर्षांच्या मुलीला अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळवून नेले. पुढील तपास हवालदार गुंजाळ हे करीत आहेत.