वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; पोलिसांनी केला गुन्हा नोंद
By नामदेव भोर | Updated: March 28, 2023 16:48 IST2023-03-28T16:48:46+5:302023-03-28T16:48:58+5:30
सीएट कंपनीजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली.

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; पोलिसांनी केला गुन्हा नोंद
नाशिक - सातपूर औद्योगिक वसाहतीत सीएट कंपनीजवळ एका दुचाकीला अज्ञात भरधाव वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणात सोमवारी (दि. २७) सातपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातपूर औद्योगिक वसाहतीत मागील बुधवारी (दि. २२) अपघातात जखमी झालेले योगेश बापूसाहेब परदेशी यांचा मृत्यू झाला आहे. योगेश परदेशी हे दुचाकीने (एमएच१५ ईएम ३४८८) सातपूर औद्योगिक वसाहतीकडून जात असताना सीएट कंपनीजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात योगेश परदेशी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांची आई भारती भाऊसाहेब परदेशी यांनी या प्रकरणात सातपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिस हवालदार आहेर या प्रकरणाचा तपास करीत आहेत.