मूक मोर्चा प्रचारासाठी दुचाकी रॅली

By Admin | Updated: September 21, 2016 00:58 IST2016-09-21T00:57:28+5:302016-09-21T00:58:06+5:30

मूक मोर्चा प्रचारासाठी दुचाकी रॅली

Bike rallies for the silent rally campaign | मूक मोर्चा प्रचारासाठी दुचाकी रॅली

मूक मोर्चा प्रचारासाठी दुचाकी रॅली

पंचवटी : मोर्चात सहभागी होण्याचे आवाहनपंचवटी : कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा व अन्य मागण्यांसाठी मराठा क्र ांतीच्या वतीने येत्या २४ रोजी नाशकात काढण्यात येणाऱ्या मराठा मूक मोर्चाच्या प्रचारार्थ पंचवटी मराठा क्रांती मोर्चा समितीच्या वतीने पंचवटी परिसरातून दुचाकी व चारचाकी वाहन रॅली काढण्यात आली.
पेठरोड येथील नवरंग मंगल कार्यालयाजवळून रॅलीची सुरुवात करण्यात आली. रॅलीच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. कोपर्डी येथील भिगनीस व काश्मीर दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांना आदरांजली वाहण्यात आली.
रॅलीत हॉर्न तसेच घोषणा न देता मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. या रॅलीत सचिन ढिकले, दिलीप मोरे, संतोष पेलमहाले, योगेश कापसे, वैभव पाटील, दिलीप सातपुते, अमित खांदवे, मधुकर ढगे, मनोज नलावडे, वैभव मालसाने, किशोर ढगे, महेश गटकळ, तुषार पवार, योगेश गांगुर्डे, करण टिळे, संदीप घाडगे, लखन पडोळ, संदीप पाटील, विलास थेटे, वैभव देशमुख, दीपक मिंधे, कुणाल भवर, अनिल थेटे, रमेश सोनवणे, नीलेश गुंजाळ, प्रकाश जाधव, सागर सोनवणे, नितीन जाधव, संदीप चव्हाण आदिंसह मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (वार्ताहर)

Web Title: Bike rallies for the silent rally campaign