बेलबाग परिसरातून सायकल चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:14 IST2021-09-19T04:14:51+5:302021-09-19T04:14:51+5:30
------------------------ दुचाकी लंपास मालेगाव: शहरातील गायत्रीनगर भागातून अज्ञात चोरट्याने ३० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेल्या प्रकरणी कॅम्प ...

बेलबाग परिसरातून सायकल चोरीला
------------------------
दुचाकी लंपास
मालेगाव: शहरातील गायत्रीनगर भागातून अज्ञात चोरट्याने ३० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेल्या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दुचाकी मालक भूषण सुभाष अग्निहोत्री यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या मालकीची दुचाकी क्रमांक एम.एच. ४१ जे. ८५५२ ही अज्ञात चोरट्याने चोरून नेली. पुढील तपास हवालदार पवार करीत आहेत.
------------------------
अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा
मालेगाव : तालुक्यातील सिताने येथील अल्पवयीन मुलीला अज्ञात कारणासाठी अज्ञात इसमाने पळवून नेल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या अल्पवयीन मुलीला काहीतरी आमिष दाखवून पळवून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील करीत आहेत.
----------------------------
डाळिंब ट्रान्स्पोर्ट मालकाची फसवणूक; ट्रकचालकाला अटक
मालेगाव : शहरालगतच्या दाभाडी येथील न्यू गायत्री रोडलाईन्स ट्रान्स्पोर्ट मालकाला ट्रकची बनावट कागदपत्रे, बनावट नंबर प्लेट, खोटे नाव सांगून डाळिंब भरून घेणाऱ्या ट्रकचालकाला छावणी पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी शरद दौलत गवळी यांनी फिर्याद दिली. त्यांच्या न्यू गायत्री रोडलाईन्स ट्रान्स्पोर्टमध्ये ट्रकचालक मुस्तफा अली मोनताज (रा. पश्चिम बंगाल) याने ट्रक क्रमांक डब्लू. बी. २५ जे. ३६४४ ची बनावट कागदपत्रे व नंबर प्लेट तयार करून तसेच नाव खोटे सांगून डाळिंब भरून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी २० लाख ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास हवालदार पाटील करीत आहेत.