वाहेगावसाळ विद्यालयात विद्यार्थिनींना सायकल वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:09 IST2018-03-25T22:37:01+5:302018-03-26T00:09:58+5:30

वाहेगावसाळ संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या वतीने सायकल वाटप कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी नाशिक रन धर्मादाय संस्थेचे सहकारी कासार होते. यावेळी नाशिक रन संस्थेतर्फे गरजू, होतकरू व दुरवरून पायी शाळेत येणाऱ्या विद्यार्थिनींना एकूण ६७ सायकलींचे वाटप करण्यात आले.

Bicycle allocation to girl students in Vahedgaon school | वाहेगावसाळ विद्यालयात विद्यार्थिनींना सायकल वाटप

वाहेगावसाळ विद्यालयात विद्यार्थिनींना सायकल वाटप

तळेगावरोही : वाहेगावसाळ संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या वतीने सायकल वाटप कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी नाशिक रन धर्मादाय संस्थेचे सहकारी कासार होते. यावेळी नाशिक रन संस्थेतर्फे गरजू, होतकरू व दुरवरून पायी शाळेत येणाऱ्या विद्यार्थिनींना एकूण ६७ सायकलींचे वाटप करण्यात आले. त्यामुळे या सर्व विद्यार्थिनींच्या चेहºयावर आनंदाचे वातावरण दिसून येत होते, तर शाळेला प्रतिमा देऊन तिचे अनावरण करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक के.डी. देवढे, दैठणकर, कासार, वृषाली राऊत, मनीषा शुक्ला, नितीन देशमुख, चौधरी, राधाजी पाटील, प्रा. महाडिक, संगीत विशारद सुवर्णा क्षीरसागर, सेवानिवृत्त वन अधिकारी दादासाहेब सोनवणे, तानाजी खैरे, संस्थेचे अध्यक्ष एन. एस. मंडलिक, श्रीकांत माळी, गोकूळ खैरे, उमेश मोरे, रघुनाथ अहेर, प्रा. जैन, दीपक खैरे, शुक्ला, शोभा न्याहारकर, महेश न्याहारकर, अरुण माळी, बाजीराव खैरे, विश्वास अहेर, भारत खैरे, शांताराम गांगुर्डे आदींसह शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.
 

Web Title: Bicycle allocation to girl students in Vahedgaon school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक