बदापूर परिसरात बिबट्याचा वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 13:06 IST2019-10-30T13:05:37+5:302019-10-30T13:06:02+5:30
येवला : तालुक्यातील बदापूर परिसरात बिबट्याने म्हशीच्या पारडूवर हल्ला करून त्याचा जीव घेतल्याची घटना घडली.

बदापूर परिसरात बिबट्याचा वावर
येवला : तालुक्यातील बदापूर परिसरात बिबट्याने म्हशीच्या पारडूवर हल्ला करून त्याचा जीव घेतल्याची घटना घडली.येथील रोकडोबा मंदिर परिसरात बदापूर शिवारातील बिबट्याचा वावर असल्याच्या पाऊल खुणा दिसल्याने दहशतीचे वातावरण होते. अशातच सोमवारी बदापूर रस्त्यावरील रोकडोबा मंदिर परिसरात सुनील अंबादास घिगे या शेतकऱ्याच्या वस्तीवर बिबट्या येऊन गेला. झोपेत असतांना म्हशीच्या गोठ्यात पहाटेच्या सुमारास रेकण्याचा आवाज घिगे यांना आला. तेंव्हाच एका बिबट्याने म्हशीच्या पारडूला आपले भक्ष केले. म्हशीचे दूध काढण्यासाठी आल्यावर हा प्रकार लक्षात आला.दरम्यान प्रस्तुत लोकमत प्रतिनिधीने वनविभागाशी संपर्क साधला. वन अधिकारी पवार यांनी घटनास्थळी दुपारच्या सुमारास भेट दिली.दरम्यान, परिसरात चिखलात बिबट्याच्या पायाचे ठसे असल्याचे लक्षात आले.रोकडोबा परिसराजवळ आता मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती आहे. येवला शहराचाच हा एक भाग आहे.
-----------------------
वृक्षांची तोड झाली, जंगलं नष्ट होत आहेत. त्यामुळे बिबटे आता अन्न पाण्यासाठी आपलं मूळ घर (जंगल)सोडत आहे.याला माणूसच जबाबदार आहे. आता मानवी वस्तीला संरक्षण देण्यासाठी आणि बिबट्याला जंगलात सोडण्यासाठी परिसरात पिंजरा लावावा.
-सुभाष पहिलवान, पाटोळे, शेतकरी