दिंडोरी तालुक्यात बिबट्याची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 13:27 IST2020-01-22T13:27:30+5:302020-01-22T13:27:56+5:30
वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील वरखेडा परिसरात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात वासरू ठार झाले असून त्यामुळे परिसरातील शेतात वस्तीवर राहणा-या नागरिकात दहशत पसरली आहे.

दिंडोरी तालुक्यात बिबट्याची दहशत
वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील वरखेडा परिसरात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात वासरू ठार झाले असून त्यामुळे परिसरातील शेतात वस्तीवर राहणा-या नागरिकात दहशत पसरली आहे. वनविभागाने बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी वरखेडा व परिसरातील नागरिकांकडून होत आहे. वरखेडा येथील माजी सरपंच माणिकराव तडाखे यांच्या वस्तीवर शेतात मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने त्यांच्या वासरावर हल्ला करीत त्यास ठार मारून फस्त केले. याबाबत वन विभागाला कळवले असता वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला आहे. सध्या शेतात द्राक्षाचा हंगाम, गहू, हरभरा, कांदे लागवड मोठ्या प्रमाणात चालू असल्याने शेतकरी वर्ग रात्रीच्या वेळेस शेतात काम करीत असल्याचे चित्र आहे. दिंडोरी तालुक्यात मागील आठवड्यापासून बिबट्याच्या हल्ल्याच्या तीन ते चार घटना घडल्या असून शेतकरीवर्ग प्रचंड दहशतीखाली वावरत आहे. तालुक्यातील हनुमंत पाडा, देवठाण आदी ठिकाणी बिबट्याने नागरिकांवर हल्ला चढवला आह. वरखेडा, जानोरी, लखमापूर, परमोरी, निळवंडी आदी भागात जनावरावरील बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकºयांनी केली आहे.