त्र्यंबकेश्वर न्यासच्या विश्वस्तपदी भूषण अडसरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 00:56 IST2021-02-25T00:00:35+5:302021-02-25T00:56:39+5:30
त्र्यंबकेश्वर : वर्षभरापासून रिक्त असलेल्या त्र्यंबकेश्वर देवस्थान न्यासच्या जागेवर येथील सामाजिक कार्यकर्ते व तालुका शिवसेनेचे पदाधिकारी भूषण अनिल अडसरे यांची नियुक्ती करण्यात आली.

त्र्यंबकेश्वर न्यासच्या विश्वस्तपदी भूषण अडसरे
त्र्यंबकेश्वर : वर्षभरापासून रिक्त असलेल्या त्र्यंबकेश्वर देवस्थान न्यासच्या जागेवर येथील सामाजिक कार्यकर्ते व तालुका शिवसेनेचे पदाधिकारी भूषण अनिल अडसरे यांची नियुक्ती करण्यात आली.
त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त दिवंगत ॲड. संतोष दत्तात्रेय दिघे यांचे निधन झाल्याने विश्वस्त पदाची एक रिक्त जागा होती. धर्मदाय आयुक्त नाशिक यांनी रिक्त जागा भरण्यासाठी प्रक्रिया सुरू केली होती. एका जागेसाठी ३३ इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. त्यानुसार विश्वस्तपदासाठी भूषण अनिल अडसरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भूषण यांच्या निवडीनंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. भूषण अडसरे यांचे आजोबा त्र्यंबकेश्वर देवस्थानचे तहयात विश्वस्त होते.