पठावे गटातील विविध विकास कामांचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 01:29 IST2021-07-21T00:19:41+5:302021-07-21T01:29:33+5:30

डांगसौंदाणे : नाशिक जिल्हा परिषदेच्या पठावे गटातील अनेक ठिकाणी विकास कामांचे भूमिपूजन पार पडले. यात तताणी येथे २५ लाख रुपये खर्च करून बांधण्यात येणारे आदिवासी सांस्कृतिक भवन, तसेच केळझर प्राथमिक आरोग्य केंद्रात पेव्हर ब्लॉक बसविणे यासह मतदारसंघात अनेक ठिकाणी विकास कामे सुरू आहेत. भूमिपूजन कार्यक्रम जिल्हा परिषद सदस्य गणेश अहिरे यांच्याहस्ते करण्यात आला.

Bhumipujan of various development works in Pathave group | पठावे गटातील विविध विकास कामांचे भूमिपूजन

पठावे गटातील विविध विकास कामांचे भूमिपूजन

ठळक मुद्दे विकास कामांचे भूमिपूजन पार पडले.

डांगसौंदाणे : नाशिक जिल्हा परिषदेच्या पठावे गटातील अनेक ठिकाणी विकास कामांचे भूमिपूजन पार पडले. यात तताणी येथे २५ लाख रुपये खर्च करून बांधण्यात येणारे आदिवासी सांस्कृतिक भवन, तसेच केळझर प्राथमिक आरोग्य केंद्रात पेव्हर ब्लॉक बसविणे यासह मतदारसंघात अनेक ठिकाणी विकास कामे सुरू आहेत. भूमिपूजन कार्यक्रम जिल्हा परिषद सदस्य गणेश अहिरे यांच्याहस्ते करण्यात आला.

यावेळी भिवंदास अहिरे, माजी सभापती मधुकर ठाकरे, सोमनाथ सूर्यवंशी, तुकाराम देशमुख, हेमंत चंद्रात्रे, वैद्यकीय अधिकारी सायली निकम, बाबूराव बागुल, नारायण सूर्यवंशी, जीवन दळवी, सुभाष बागुल, हिरालाल बाविस्कर, धनंजय देशमुख, भिवदास अहिरे, देवराम टोपले, कैलास ठाकरे, मधुकर बहिरम, देवमन बहिरम, यशवंत देशमुख, उमाकांत नांद्रे, लक्ष्मण चौरे, गोविंद ठाकरे, वामन चौरे, गंगाधर पवार, पंडित बागुल, सुरेश गवळी, पुंडलिक ठाकरे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते. 

पठावे जिल्हा परिषद गटातील जनतेने जो विश्वास दाखवला आहे, त्याला तडा जाऊ देणार नाही. प्रत्येक गावात विविध विकास कामे प्रत्यक्षात सुरू करण्यात आलेली आहेत. जनतेच्या गरजा ओळखून त्यानुसार कामे सुरू आहेत.
- गणेश अहिरे, जि. प. सदस्य, पठावे दिगर गट.
 
Web Title: Bhumipujan of various development works in Pathave group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.