शिवजयंती रंगमंच उभारणीचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:39 IST2021-02-05T05:39:36+5:302021-02-05T05:39:36+5:30

जयंतीनिमित्त नाशिक रोड परिसर भगवामय करण्यात येणार असून स्वागत कमानी व प्रवेशव्दार उभारण्यात येणार आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत. ...

Bhumi Pujan of Shiv Jayanti Theater | शिवजयंती रंगमंच उभारणीचे भूमिपूजन

शिवजयंती रंगमंच उभारणीचे भूमिपूजन

जयंतीनिमित्त नाशिक रोड परिसर भगवामय करण्यात येणार असून स्वागत कमानी व प्रवेशव्दार उभारण्यात येणार आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत. सुनील समजीकर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रंगमंच उभारण्यात येणार आहे. भूमिपूजन शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष विक्रम कोठुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार योगेश घोलप, समिती कार्याध्यक्ष राहुल बोराडे, संतोष वाघचौरे, निलेश कर्डिले, राजेश आढाव, राहुल निस्ताने, गिरीष पालवे, जयश्री खर्जुल, बंटी भागवत, राजेश फोकणे, विशाल संगमनेरे, सुनील आडके, संभाजी मोरूस्कर, पंडित आवारे, सूर्यकांत लवटे, प्रशांत दिवे, जगदीश पवार, हेमंत गायकवाड, संदेश सोनवणे, संतोष क्षीरसागर, सुनील बोराडे, सत्यभामा गाडेकर, संगीता गायकवाड आदी उपस्थित होते.

चौकट===

सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

जयंतीनिमित्त नाशिक रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे १८ फेब्रुवारीला सायंकाळी सातला शाहीर यशवंत जाधव यांची शाहिरी, रात्री बाराला पुतळा पूजन, दि. १९ रोजी सकाळी पुतळा अभिषेक, महापूजा, रक्तदान शिबिर, पालखी मिरवणूक, मोटारसायकल रॅली, सायंकाळी मिरवणूक, दि. २० रोजी आरोग्य शिबिर, सायंकाळी सातला ढाेक महाराजांचे कीर्तन, दि. २१ रोजी सकाळी सहा वाजता सायकलिस्ट राजेंद्र नावखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड ते शिवनेरी सायकल रॅली, दि. २२ रोजी उदय साटम यांचा मराठ मोळी परंपरा कार्यक्रम, दि.२३ रोजी खासदार छत्रपती संभाजी महाराज यांचे मार्गदर्शन होईल.

(फोटो ०३ शिव)

Web Title: Bhumi Pujan of Shiv Jayanti Theater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.