सटाण्यात देवमामलेदारांच्या स्मारकाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 00:52 IST2021-01-20T21:03:44+5:302021-01-21T00:52:20+5:30

सटाणा : शहराचे ग्रामदैवत दैवत संतशिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज स्मारकाच्या भूमिपूजन समारंभासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे बुधवार, ३ फेब्रुवारी रोजी सटाणा दौऱ्यावर येत असल्याची माहिती नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी दिली.

Bhumi Pujan of the memorial of Devmamaledar in Satana | सटाण्यात देवमामलेदारांच्या स्मारकाचे भूमिपूजन

सटाण्यात देवमामलेदारांच्या स्मारकाचे भूमिपूजन

ठळक मुद्देराज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम

सटाणा : शहराचे ग्रामदैवत दैवत संतशिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज स्मारकाच्या भूमिपूजन समारंभासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे बुधवार, ३ फेब्रुवारी रोजी सटाणा दौऱ्यावर येत असल्याची माहिती नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी दिली.
यासंदर्भात नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, राज्यपाल कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेवून ३ फेब्रुवारी रोजीची नव्याने वेळ मिळाली आहे. संतशिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज स्मारक भूमिपूजन समारंभासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे हस्ते व कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पालकमंत्री छगन भुजबळ हे असतील. प्रमुख पाहुणे म्हणून कृषिमंत्री दादाजी भुसे, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनुपरे, माजी पर्यटनमंत्री जयकुमार रावल, खा. डॉ. सुभाष भामरे, आ. दिलीप बोरसे, नगरविकास सचिव महेश पाठक, नगरपरिषद संचालक किरण कुलकर्णी, पर्यटन विभागाच्या संचालक वल्सा नायर, पर्यटन विभागाचे संचालक डॉ. धनजंय सावळकर, नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांचे प्रमुख उपस्थितीत स्मारकाचा भूमिपूजन सोहळा होणार आहे. यावेळी नगराध्यक्ष सुनील मोरे उपनगराध्यक्ष राकेश खैरनार, नगरसेवक महेश देवरे, नितीन सोनवणे, गटनेते रा.कॉ पार्टी, दिनकर सोनवणे, मनोहर देवरे,मुख्याधिकारी हेमलता डगळे आदी उपस्थित होते.

सोहळ्याची जय्यत तयारी
भुमिपुजन सोहळा झाल्यानंतर नजीकच असलेल्या दगाजी सिनेमा पॅलेस येथे मुख्यसमारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्‍वभुमीवर शहरात पालिका व प्रशासनाने व देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज ट्रस्ट ने जय्यत तयारी सुरू करण्यात आली असुन न भुतो न भविष्यती असा हा नयनरम्य सोहळा आयोजित करण्यात येत असल्याचे ट्रस्ट चे अध्यक्ष भालचंद्र बागड यांनी स्पष्ट केले.

सुरगाण्यातही राज्यपाल येणार
सुरगाणा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे ३ फेब्रुवारी महिन्यात सुरगाणा तालुक्यातील भोरमाळ व भिंतघर येथे भेट देणार असल्याने दौऱ्याआधी या ठिकाणी तयारीला वेग आला आहे. तालुक्यातील भोरमाळ येथे काजू प्रक्रिया उद्योग सुरू झाला आहे. या माध्यमातून परिसरातील महिला, महाविद्यालयीन विद्यार्थिनी, बचत गटातील महिला सदस्य यांना रोजगार उपलब्ध झाला आहे. नवा रोजगार मिळाल्याने येथील अर्थचक्र सक्रिय राहिले आहे. त्याचप्रमाणे राज्यातील पहिले गुलाबी गाव अशीही या गावाची ओळख आहे. या गावात मुलींच्या सक्षमीकरणाचा संदेश देण्यासाठी घराच्या भिंती गुलाबी रंगाने रंगविल्या आहेत. तसेच या ठिकाणी देशी गोशाळा सुरू करण्यात आली आहे. या गोशाळेत परिसरातील बचत गटाच्या महिला, मुलींना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच गाईंचे शेण, गोमूत्र यापासून १९ प्रकारची औषधे तयार करण्यात येत आहेत. याशिवाय गवरी किंवा अन्य सामान तयार करण्यात येत असून त्या ठिकाणाहून त्याचे विपणन होत आहे. राज्यपाल आपल्या दौऱ्यात या दोन्ही केंद्रांना भेट देणार आहेत.

Web Title: Bhumi Pujan of the memorial of Devmamaledar in Satana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.