भुजबळ यांची होळकर यांनी घेतली भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 00:08 IST2018-05-11T00:08:13+5:302018-05-11T00:08:13+5:30
लासलगाव : माजी मंत्री छगन भुजबळ यांची त्यांचे कट्टर समर्थक व सध्या शिवसेनेत असलेले लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जयदत्त होळकर यांनी गुरुवारी मुंबईत भेट घेतल्याने राजकीय नेते व कार्यकर्ते यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

भुजबळ यांची होळकर यांनी घेतली भेट
लासलगाव : माजी मंत्री छगन भुजबळ यांची त्यांचे कट्टर समर्थक व सध्या शिवसेनेत असलेले लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जयदत्त होळकर यांनी गुरुवारी मुंबईत भेट घेतल्याने राजकीय नेते व कार्यकर्ते यांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावेळी लासलगावचे माजी उपसरपंच संतोष ब्रह्मेचा व किशोर गोसावी यांच्यासह काही ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते. दोन वर्षांपूर्वी भुजबळ तुरु ंगात असतानाच लासलगाव परिसरातील त्यांचे निकटचे विविध नेते वेगवेगळ्या पक्षात दाखल झाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एकेकाळी नेत्यांची जी कमालीची भाऊगर्दी होती ती बऱ्यापैकी कमी झाली. त्यातील काही जण भाजपात दाखल झाले. तसेच जयदत्त होळकर व तत्कालीन उपसभापती बाळासाहेब क्षीरसागर शिवसेनेत दाखल झाले आहेत.