भुजबळ समर्थकांकडून बसवर दगडफेक
By Admin | Updated: March 18, 2016 00:05 IST2016-03-18T00:00:44+5:302016-03-18T00:05:18+5:30
तिघे संशयित ताब्यात : पळसे फाट्यावर वाहतुकीचा खोळंबा

भुजबळ समर्थकांकडून बसवर दगडफेक
नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावरून श्रीरामपूरच्या दिशेने जाणारी श्रीरामपूर आगाराच्या बसवर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थकांनी दगडफेक के ल्याची घटना पळसेगावाजवळ घडली. याप्रकरणी तिघा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.
ईडीने भुजबळ यांच्यावर अटकेची कारवाई केल्याच्या निषेधार्थ समाधान भीमाजी सरोदे, बाळू मुंजा चौधरी, गणेश अशोक गायधनी या तिघांनी बसवर (एमएच १४ बीटी ४८७६) पाठीमागून दुपारच्या सुमारास दगडफेक केली. दगडफेकीत बसचे नुकसान झाले. बसचालक रवींद्र नारायण गरकर यांच्या तक्रारीवरून तिघा संशयितांविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास नाशिकरोड पोलीस करत आहेत. (प्रतिनिधी)